WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रस्त्यावरील मोकाट जनावरांचा वाली कोण?...

Image

अपघाताच्या प्रमाणात वाढ:- संबंधित विभागाचे दुर्लक्ष....

प्रतिनिधी वणी सुरज चाटे :-

वणी शहरात मोकाट जनावरांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना याची डोकेदुखी वाढली आहे कधी जनावर वाहनाला येऊन धडकेल याचा नेम उरला नसून संबंधित विभाग मात्र याकडे दुर्लक्ष च करीत असून मोठा अपघात झाल्यानंतरच त्यांना चेव येणार आल्याचे परिसरातील ये जा करणाऱ्या जनतेकडून बोलल्या जात आहे.

शहरात ऐन मोक्याच्या ठिकाणी हे मोकाट जनावरे आपले स्थान ग्रहण करतात. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मोकाट जनावरांसंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांना सूचना दिल्या तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपंचायत व नगरपरिषदमधील सर्व पोलिस ठाण्याच्या ठाणेदारांना सूचना दिल्या आहे. याबाबत जनावर मालकावर थेट कारवाही करण्याचा आदेश पोलिसांना देण्यात आला आहे. नगरपंचायतीच्या पथकाने सहकार्य करण्यात यावा इतकेच नव्हेतर महसूलच्या उपविभागीय उपदंडाधिकारी व तालुका दंडाधिकारी यांनाही कडक कारवाही करण्यास सूचना दिल्या आहे. या मोकाट जनावरांमुळे अपघात होण्याचे प्रसंग बरेचदा घडल्याचे समोर आले आहे. मोकाट जनावराचा विषय गंभीर बनला आहे. साई मंदीर, एसटी स्टॅन्ड, टिळक चौक, दिपक चौपाटी, वरोरा रोड, यवतमाळ रस्त्यावर हे जनावरे ठिय्या मांडून असतात. या नगरपंचायत, नगरपरिषदांच्या कारभारांवर आता चांगले संतापल्याचे समजते आहेत. मोकाट जनावरांचा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी कठोर पावले उचलले आहे. दरम्यान, दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाही करावी. अशी समस्त तक्रार नागरिकातून केली जात आहे.

आज दिनांक 7 ला 11 वाजताच्या दरम्यान गुप्ता सायकल स्टोअर्स जवळ अशाच मुक्या जनावरांचा अपघात झाला असता त्या जनावराला नागरिकांनी त्याचा उपचार केला, तसेच त्या जनावराच्या पायाला गंभीर इजा झाली होती अशाच प्रकारच्या घटना परिसरात जोर धरत असून संबंधित विभाग मात्र अजूनही झोपेतच दिसत असून त्यामुळे मोठी घडणा घडण्यास नाकारता येत नाही. संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून मोठी घटना घडण्याअगोदार लक्ष देण्याची गरज आल्याचे परिसरातील नागरिकांकडून बोलल्या जात आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share