WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सहाशे जिवंत कोंबडया आगीत ‘फ़्राय’; तर चिकन सेंटर जळून खाक..

Image

आगीत चिकन सेंटर जळून खाक..सहाशे जिवंत कोंबडया ‘फ़्राय’

झरी जामणी- तालुक्यातील सय्यद हारून सय्यद ख्वाजा यांचा चिकन विक्रीचा व्यवसाय होता. सिलेंडरच्या पाईपमधून गॅस गळती झाली असता सय्यद यांचे चिकन सेंटर संपूर्ण दुकान अगीत भस्म झाले. ही घटना मुकुळबन स्थित दुकान मंगळवारी २२ रोजी सांयकाळी साडेसातच्या दरम्यान गॅस सिलेंडरच्या रेग्युलेटरलगत असलेल्या पाईपला आग लागली. आगीने भीषण पेट घेउन चिकन सेंटरला आगीच्या वीळख्यात घेतले.

या घटनेची माहिती पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेउन एकच गर्दी केली होती. पोलिसांना माहिती दिली असून अग्निशामक दलाला आग विझाविण्याकरिता ताबडतोब बोलावून आगीवर नियत्रंण आणले. तत्पूर्वी आगीचा भडका इतका भयंकर होता की, आगीला नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागली होती.

संबधित सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या दरम्यान सय्यद यांच्या ६० हजार किमतीच्या ६०० किलो जिवंत कोंबडया तसेच ३ लाखाचे शेड असे एकूण तिन लाख ६० हजार रुपयांचे मोठे नुकसान झाले. मुकुटबन येथील पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक युवराज राठोड, जमादार कुळमेथे, उइके होमगार्ड ताडूवार, अग्निशामक वाहनचालक कातारकर, कोतवाल कांबळे सह व्यास, बावनकर, राणे, साळवे आदींनी मोलाची कामगिरी बजावली आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share