WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

क्रांती युवा संघटनेचे सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य आ. बोदकूरवार.... संघटनेची आमदारांना भेट....

Image

वणीतील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेली क्रांती युवा संघटना गेल्या काही वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा तुरा रोवत असून दिनांक 05 ला सायंकाळच्या दरम्यान क्रांती युवा संघटनेच्या संपूर्ण सदस्य पदाधिकारी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या निवासस्थानी उपस्थित राहून त्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला व विविध समस्येबाबत चर्चा सुद्धा करण्यात आली.

भविष्यात क्रांती युवा संघटना ही सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक दृष्ट्या सर्वोत्तपरी आरोग्य, शिक्षण व विविध प्रकारचे कॅम्प घेऊन सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणार असल्याचे सर्व सदस्यांनी सहमती दर्शवली असता आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सुद्धा त्याला मान्यता देत सामाजिक दृष्ट्या उपक्रम करून गोर गरीब जनतेच्या सेवेत राहा मी तुमच्या सदैव सोबत आहे असे बोलून दाखविले.

आमदार मोहोदयाना दिलेल्या भेटी दरम्यान विविध समस्येवर चर्चा करीत क्रांती युवा संघटना ही गरीब कष्टकरू होतकरू युवकांची संघटना असल्याने तुम्ही सामाजिक दृष्टीकोणातून कार्य करा मी तुमच्या सोबत आहे, गेल्या काही वर्षात सामाजिक दृष्टिaन ठेऊन वणी सह परिसरात मोठ्या नावरूपात आलेली क्रांती युवा संघटचे कार्य अविरत सुरू राहण्याकरिता त्यांनी शुभेच्या सुद्धा दिल्या. यावेळी क्रांती युवा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share