WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लोकशाही ही जगण्याचा भाग आहे.. उत्तम कांबळे यांचे प्रतिपादन

Image

सागर मुने :-

लोकशाही म्हणजे फक्त निवडणुक नव्हे तर लोकशाही हा खाजगी आणि सार्वजनिक विचाराचा भाग आहे.लोकशाही हा दैनंदिन आयुष्य जगण्याचा भाग आहे.म्हणुन आपण तो स्विकारावा, असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक,विचारवंत व चोविसाव्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ऊत्तम कांबळे यांनी दि.१६ नोव्हेंबर रोजी वणी येथे संपन्न झालेल्या बळीराजा व्याख्यानमालेत केले. स्थानिक बाजोरीया लॉन येथे संपन्न झालेल्या चार्वाक विचारपीठा वरून व्यक्त होतांना ते म्हणाले की सद्याच्या राजकारणातील नंबर गेम लोकशाहीची धिंड काढणारी असून संविधानाच्या माध्यमाध्यमातून लोकशाहीला संकोचीत करण्याचा हा प्रयत्न आहे.

गेल्या 70 वर्षात या देशात फक्त पन्नास घरांची सत्ता आहे, लोकशाही सत्तेच विकेंद्रीकरण सांगते मग ती प्रत्यक्षात का उतरत नाही याचा शोध घेण्याची गरज असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. देशाची सामाजीक लोकशाहीकडे न झालेली वाटचाल क्लेशदायक असून बिगर सामाजीक आणि आर्थिक लोकशाहीशिवाय राजकीय लोकशाही एक दिवस लोक उलथुन लावतील हा आशावाद त्यांच्या व्याख्यानातून दिसत होता. या देशाचा मालक मी आहे ही भावना जनमान रुजवण्यात ही व्यवस्था कमी पडल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. गेल्या 4 वर्षापासून शिव महोत्सव समिती,वणी व्दारा बळीराजा व्याख्यान माला घेण्यात येत आहे.

त्यामध्ये या वर्षी जेष्ठ संपादक उत्तम कांबळे हे वक्ते होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जि.प. महिला व बालकल्यान सभापती अरुना खंडाळकर, प्रमुख पाहूने म्हणून शिव महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष अॅड. निलेश चौधरी, भास्कर काळे, अशोक राजूरकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, सामाजिक कार्यकर्ते विलास गवारकर, धोबी समाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू तूराणकर व जिजाऊ ब्रिगेडच्या छाया वागदरकर ह्या उपस्थित होत्या. याप्रसंगी शिव महोत्सव समीतीचे अध्यक्ष डॉ. रमेश सपाट यांनी प्रासंगिक मनोगत व्यक्त करून आयोजना मागील भुमिका स्पष्ट केली. या व्याख्यानमालेतील हे पहिले पुष्प स्मृतीशेष परमानंद रामचंद्र कापसे यांना समर्पित होते.

संचालन मारोती जीवतोडे तर प्रास्ताविक म.से. संघाचे अध्यक्ष मंगेश खामनकर यांनी केले. आभार वसंत थेटे यांनी मानले .यावर्षीच्या व्याख्यान मालेतील ख्यातनाम साहितीक मा . कांबळे सरांना ऐकण्यास वणीकरांनी प्रचंड गर्दी केली होती.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share