WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चैत्यन्य झाडे राज्यस्तरीय स्विमिंग स्पर्धेसाठी टॉपटेन पुरस्काराचा मानकरी ठरला

Image

३ की.मि. अंतराच्या समुद्रात चक्क! ५७ मिनिटात स्विमिंग पार करून महाविक्रम

-अमोल कुमरे

यवतमाळ- संस्कार इंग्लिश मिडीअम स्कुल यवतमाळ येथील ९ व्या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी चैत्यन्य चंद्रशेखर झाडे हा ‘10th STATE SWIMMING COMPTION, MALVAN’ येथील होणाऱ्या स्पर्धेत पहिल्या ‘टॉपटेन’ मध्ये क्रमांक पटकाविला आहे. त्याच्या या घवघवीत यशाची सर्वत्र चर्चा असून कौतुकाचा मानकरी ठरला आहे.

राज्यस्तरीय स्विमिंग स्पर्धेत चैत्यन्य हा यवतमाळ जिल्ह्यातून एकमेव स्पर्धक आहे. त्याने ३ की.मि. अंतराच्या समुद्रात चक्क! ५७ मिनिटात स्विमिंग पार करून महाविक्रम केला. आंतरराष्ट्रीय जलतरण पटु श्री. उदय कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरकर जलतरण केंद्र, यवतमाळ येथे प्रशिक्षण घेतले जात आहे. त्याच बरोबर

तात्याजी जिवतोडे करणवाडी (आजोबा) यांचा नातू आहे. आजोबांच्या वेळोवेळी मार्गदर्शनाखाली चैत्यन्य’ला पोहण्याचा रोज तिन तास पाण्यात सराव करावा लागतो. रोज तो नित्याने पाण्यात पोहण्याचा सराव करतो. अशातच त्याची ‘10th STATE SWIMMING COMPTION’ MALVAN येथे निवड झाली आणि तो पहिल्या टॉपटेन मध्ये आला आहे. ही निवड आणि पहिला ‘टॉपटेन’ क्रमांक संपूर्ण महाराष्ट्रासह यवतमाळ जिह्यातील जनसमाजाचा बहुमान आहे. आपल्या यशाचे तो श्रेय पूज्य चंद्रशेखर झाडे (वडिल) मीना झाडे (आई) आजी-आजोबा, शिक्षकवृंद आणि मित्र परिवार यांना देतो.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share