WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चिमुकल्यांचे आयुष्य धोक्यात, नगरपालिका व लोकप्रतिनिधी करीत आहे सर्रास दुर्लक्ष

Image

जनता शाळेच्या विद्यार्थींना करावी लागत आहे, सांडपाण्यातून पायपीट

सागर मुने, वणी

विद्या परम दैवतम: या श्लोका मध्ये, विद्येचे अनन्य महत्व हे पिढ्यान पिढ्या पासून सांगितले आहे. तसेच आपल्या थोर महात्मांनी सुध्दा, शिक्षणाचे महत्व पटवून दिले. आणी प्रत्येक प्रवाहाला या मध्ये ओढण्याचे कार्य त्यांनी केली. परंतु या थोर महात्मांनी केलेल्या, शिक्षणाच्या प्रसाराला वणी येथील जनता महाविद्यालय अपवाद ठरत आहे. जनता विद्यालया मध्ये, चिमुकले ज्ञान घेण्यासाठी येतात. परंतु शाळेच्या पटांगणाच्या मधोमध असलेल्या सांडपाण्याच्या प्रवाहाने ,संपूर्ण शेकडो चिमुकल्यांना,मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे. परंतु अजून पर्यंत लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनाला जाग आलेला नाही.

शिवसेनेचे शहर अध्यक्ष राजू तुरांनकर यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देउन ,त्या सांडपाण्यामुळे कित्येक विद्यार्थीची प्रकृती खराब झाली. हे निवेदना द्वारे निर्देशनात आणुन दिले आहे. त्या सांडपाण्याची विल्हेवाट योग्य ठिकाणी लवकरात लवकर लावावी..न लावल्यास शिवसेना तिव्र आंदोलन करणार असा इशारा शहर अध्यक्ष राजू तुरांनकर यांनी दिला.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share