WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीच्या आशिष रोगे यांना पी. एच . डी . प्रदान

Image

सागर मुने, वणी

शहरातील सामान्य कुटुंब मधील असलेल्या आशिष याने अतिशय मेहनत घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले व आज त्याला आचार्य पदवी सुध्दा मिळाली.

_श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी चे नांदेड फार्मसी कॉलेज प्राध्यापक आशिष बबनराव रोगे यांना नुकतीच स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने पी . एच. डी. प्रदान केली. पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जि. आर. शेंदारकर यांच्या मार्गदर्शनाखाली ( investigation and characterisations of degradation product in pharmaceutical active moiety of natural and synthetic origin) औषधनिर्माणशास्त्र या विषयात प्राध्यापक रोगे यांनी डॉ. राजेंद्र. बी. काकडे डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स नागपूर, परीक्षक यांच्या समक्ष शोधनिंबध सादर केला . प्रा. डॉ. एस. एम. वडवळकर, प्राचार्य . डॉ. एन. बी. घिवारे, डॉ. एम. एस. घंटे, डॉ. एस. जी.गटानी, डॉ. एस. सी. ढवळे, डॉ. एस. जे. वडेर, डॉ. एस. एस. पेकमवर , डॉ. एस. आर. बुटले तसेच नांदेड फार्मसी कॉलेज चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले . प्रा. रोगे यांना भावी वाटचालीस श्री शारदा भवन एज्युकेशन सोसयटीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष तशेच सचिव या मान्यवरांनी शुभेच्या दिल्या..__

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share