WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नारी रक्षा समितीची शासकिय विश्रामगृहात बैठक संपन्न

Image

प्रतिनिधी: रोहन रा आदेवार

यवतमाळ: यवतमाळ येथे नारी रक्षा समितीच्या वतीने २७ डिसेंबर २०१९ रोजी स्थानिक शासकिय विश्रामगृहात मीराताई फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली,या बैठकीमध्ये नारी रक्षा समितीची स्थापना करणे तसेच समिती उद्देश स्पष्ट करण्याच्या दृष्टीने या बैठकीत विवीध मुद्द्यांवर सर्वानुमते मते चर्चा करण्यात आली.यामध्ये प्रामुख्याने,_*

-२ दिवसापूर्वी घडलेल्या अल्पवयीन महाविद्यालयीन मुलीच्या छेडखानीच्या प्रकरणाची चौकशी करण्याबाबत पोलीस अधिक्षक यांना निवेदन सादर करणे,

-नारी रक्षा समितीची स्थापना करुन यवतमाळ शहरातील मुलीं,महिलांना सुरक्षितता मिळण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत मिळावी यासाठी पोलीस अधिक्षक यांना निवेदन देणे

-नाशिक येथे विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या स्पेशल फोर्स यवतमाळ तयार करावी हि मागणी

-गंभीर अडचणीत सापडलेल्या महिलांचे रक्षण करणे व त्याब ना मदत करणे,

-मुलीचे शोषण व अत्याचाराला आळा बसवणे

-लहान मुलां-मुलींच्या शाळेत जाऊन तेथील लहान मुलींना गुड टच बॅड टच विषयी माहिती देणे,

-महिलांना आत्म रक्षणासाठी प्रशिक्षण देणे व त्यांना कणखर बनवणे,

-शहरातील शाळा व महाविद्यालयात भेटी देऊन होणाऱ्या त्रासदायक प्रकारा बद्दल व छेडछाडीच्या संदर्भात जागृत करणे

-ब्लॅक पेपर स्पे मुलींना व महिलांना पुरवण्यासाठी सहभाग घेणे

-शहरातील प्रत्येक प्रभागात एक विशेष पाल्य संरक्षण समिती स्थापन करून तेथील समस्या जाणून घेणे,

-महिला करिता कोणकोणत्या सरकारी येजना आखण्यात येतात सरकार कडून त्या जाणून घेणे व त्या राबवणे,

-कोणत्याही महिलेची किंवा मुलींची दुचाकी गाडी निर्जन स्थळी पंचर झाली गाडी कोणत्याही कारणास्तव खराब झाली पेट्रोल संपले तर आपले सदस्य त्या ठिकाणी पोहचवून गाडी दुरुस्ती करण्याची जीमेदरी घेईल व त्या आई बहिणीला त्यांच्या घरी पोहचवून देण्यात येईल

इत्यादी महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली या बैठकीला मिराताई फडणीस, शितलताई तेलंगे,अवंतीताई चौधरी,मनिषाताई तिरणकर,पुष्पाताई जाधव,मंदाताई गुडदे,रेखाताई पलटनकर,दुर्गा ताई पटले,लताताई चंदेल,प्रतिभाताई हरणखेडे, शामभाऊ बजाज,विनोद दोंदल,सुकांत वंजारी,मनीष सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share