WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

यवतमाळ चे नवीन बसस्थानकात प्रवासी ग्राहक भोगताय नरक यातना !

Image

- प्रतिनिधी प्रसाद नावलेकर

प्रवासी ग्राहकांना केव्हा पुरविणार सुविधा !

ग्राहक प्रहार संघटनेचा संतप्त सवाल !

यवतमाळ येथे बसस्थानकाचे नव्याने बांधकाम सुरू असल्याने बस्थानकानकाचे स्थांनातरंण करण्यात आले आहे नवीन बसस्थांनक तयार व्हायला दोन वर्षे पेक्षा अधिक काळ लागणार असून प्रवाश्यानी ह्या यातना का सहन करायच्या ?.ह्या बस स्थानकात असलेले मैदानावर डांबरीकरण नाही .जिथून आपण प्रवेश करतो तिथे संडास मुत्रीघराचे सांडपाणी पसरलेले आहे .कोणत्याच गाड्या वेळेवर सुटत नसून कोणाचेच नियंत्रण आहे असे वाटत नाही .बस स्थानकातून प्रवासी वाहतूक करणारे लोक प्रवासी बस्थांनकातून बाहेर घेऊन जाताना दिसतात !

सर्व प्रथम सांडपाणी जे वाहत आहे ते बंद करण्यात यावे ,बसस्थानकाचा परिसरात डांबरीकरण करण्यात यावे ,सुलभ स्वच्छतालयाची व्यवस्था करण्यात यावी.पीण्या साठी RO पाणी उपलब्ध करून दयावे , ज्यादा चौकशी कक्ष उघडण्यात येऊन बसेस वेळेवर सुटसुटीत ह्याचे नियोजन करण्यात यावे ,ज्या गाड्या रद्द झाल्या त्या बाबत जाहीर माईक वरून करण्यात यावे .

अशी मागणी ग्राहक प्रहार संघटनेने केली असून 15 दिवसात जर एसटी महामंडळाने जर सुविधा प्रवासी ग्राहकांना पुरविल्या नाही तर ग्राहक प्रहार संघटना ग्राहक न्याय मंचात याचिका दाखल करण्यात येईल असा ईशारा ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ राजेंद्र आत्राम,जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर,जिल्हा संघटक बंडूभाऊ लवटे जिल्हा कार्याध्यक्ष दामोध बाजोरीया ,उपाध्यक्ष यशवंत काळे ,कोशाध्यक्ष सुनील धवने सहसचिव भैय्यासाहेब ठमके,,पांढरकवडा तालुका उपाध्यक्षसज्जन सोयम , पाटनबोरी सर्कल प्रमुख जयवंत बावणे,झरी जामनी सर्कल प्रमुख मनोज गेडाम,राळेगाव सर्कल प्रमुख दिलीप वाढई,घाटंजी सर्कल प्रमुख कृतनजय देशपांडे ,आर्णी चे अध्यक्ष शेख सत्तार शेख रज्जाक , मारेगाव सर्कल प्रमुख सचिन मेश्राम ,शिबला सर्कल प्रमुख धनराज तिरमनवार ,राजेंद्र उपलेंचवार प्रदीप भानारकर , सचिन काकडे,

अजय दुमनवार आदींनी दिला असून जिल्हाधिकारी ह्यांना निवेदन पाठविण्यात आले असून संघटनेच्या सर्व सदस्यांच्या सह्या आहेत .वरील मागणीला विविध संघटनांचा सुध्दा पाठींबा दिला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share