WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे तिहेरी ऐतिहासिक यश....

Image

सागर मुने, वणी

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा घेण्यात आलेल्या उन्हाळी २०१९ च्या इतिहास विषयाच्या पदव्युत्तर परीक्षेत लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या तब्बल तीन विद्यार्थिनींनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पल्लवी प्रकाश भटारकर हिने संपूर्ण विद्यापीठात प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवले आहे.

तिच्यासोबत मनीषा प्रेमनाथ जीवतोडे हिने चतुर्थ स्थान तर भारती रणजीत शेरकी हिने आठवे स्थान प्राप्त केले आहे. महाविद्यालयाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद अशा या कामगिरी करिता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला, उपाध्यक्ष रमेश अणे, सचिव लक्ष्मण भेदी, सहसचिव अशोक सोनटक्के यांच्या सह सर्व संचालक, महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे, इतिहास विभाग प्रमुख रेखा बडोदेकर यांनी या तिघींचेही अभिनंदन केले आहे.

इतिहास विषयाच्या विभाग प्रमुख डॉ.बडोदेकर मार्गदर्शनात पदव्युत्तर विभागाचे अध्यापक प्रशांत पाठक, सुवर्णा बुऱ्हाण, आनंद बनसोड आणि मनीष पारखी यांच्या अथक प्रयत्नाने हे यश प्राप्त झाले आहे. हे सर्व अध्यापक देखील याच विभागाचे माजी विद्यार्थी आहेत हे विशेष वैशिष्ट्य आहे.

वणी सारख्या सुदूर क्षेत्रातील तालुकास्तरावरील महाविद्यालयांने मिळवलेले हे देदीप्यमान यश, एकाच महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थीनी गुणवत्ता यादीत असणे कदाचित विद्यापीठाच्या इतिहासात पहिलीच घटना असावी.

यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करताना संस्थेचे सचिव लक्ष्मण भेदी. प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे तथा विभागाचे प्राध्यापक.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.