WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

निराधार योजना अंतर्गत सर्व केसेस ताबडतोब निकाली काढा- मंगेश पाचभाई

Image

•निवेदन देऊन तहशीलदाराला केली मागणी

शहर प्रतिनिधी/ संघर्ष भगत (झरी जामणी)

झरी जामनी तालुका हा अति दुर्गम भाग असून तालुक्यातील बहुतांश वृद्ध लोकांचे निराधारांचा लाभ त्यांना भेटला नाही.

झरी जामनी तालुक्यात निराधार समिती गठीत नसल्यामुळे मागील कित्तेक दिवसापासून प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे निराधार निकाली निघाले नाही. श्रवण बाळ योजना, संजय गांधी योजना या सर्व वृद्ध लोकांसाठी शासनाने उपलब्ध करुन दिल्या आहे .

तरी श्रवण बाळ योजना व संजय गांधी योजने अंतर्गत तालुक्यातील सर्व केसेस वृद्ध माता पिता यांच्या त्वरित निकाली लावा अशी मागणी युवा समाजसेवक मंगेश धनंजय पाचभाई यांनी तहसीलदार यांच्याकडे मागणी केली आहे.

यावेळी गणेश बुरडकर, विलास देठे, राहुल ठाकूर, दिनेश जीवतोडे, दत्ता लालसरे, संतोष पारखी आदी उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share