WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ओल्या कापसाला लागली आग .....खरं की खोटं

Image

- प्रतिनिधी सागर मुने, वणी

शहरा लगत निळापूर रस्त्यावर अहफाज कॉटन प्रोसेस जिनिंग मध्ये गुरुवारी दुपारी आग लागून साधारणपणे 15 लाख रुपयेचा कापूस जळल्याची घटना घडली. अशी माहिती अहफाज जीनिगच्या मालकाने आरिफ अब्दुल कादर यांनी दिली.

या जिनिंग मध्ये खुल्या जागेवर टॅक्टर च्या मदतीने कापसाच्या गँजी मारण्याचे काम सुरू होते. टॅक्टर ला असलेले ब्लेड आणि सिमेंट फ्लोरिंगच्या घर्षणाने ठिणगी निघाली व कापसाच्या गँजीला आग लागली व 15 लाखाचे नुकसान झाले असे म्हणणे जिनिंग मालकाचे आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नुकसान खूप कमी झाले आहे अशी माहिती मिळाली, त्यामुळे पोलिसांना माहिती विचारली असता त्यांनी चौकशी केली व फक्त 75 हजार रुपयांचा कापूस जळाला अशी माहिती पोलिसांनी दिली.

जिनिंग मालक म्हणतात 15 लाख व पोलीस म्हणतात 75 हजार, कोण खर बोलत आहे व कोण खोटं बोलत आहे याचा संभ्रम निर्माण झाला आहे. सध्या शहरात सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे, याच जिनिंगला वारंवार आग कशी काय लागते, यापूर्वी ही आग लागली होती व इन्शुरन्स कंपनी कडून नुकसानभरपाई मिळाल्याची माहिती आहे.

बुधवारी सायंकाळी 6 वाजता गारपीटा सह जोरदार पाऊस झाला व गुरुवारी पहाटे 5 वाजता पुन्हा पाऊस आला होता. प्रश्न निर्माण असा होतो की इतका जोरदार पाऊस झाला तरीही कापसाला आग लागली कशी, म्हणून खर की खोटं हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या घटनेत शासनाची व इन्शुरन्स कंपनीची दिशाभूल करून लाखो रुपयांचा चुना लावण्याच काम होऊ शकते. त्यामुळे वणीचे ठाणेदार वैभव जाधव यांनी सखोल चौकशी केली तर यापूर्वी ही लागलेल्या आगेची घटना व त्यातील झालेला भ्रष्टाचार उघडकीस येऊ शकतो. वणी पोलीस काय करतील या कडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share