WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मातापालक सभेत आंतराष्ट्रीय शिक्षण पद्धती वर चर्चा

Image

- वणी शहर प्रतिनिधी:- निलेश चौधरी

जि प उच्य प्राथमिक शाळा मारेगाव (को ) मातापालक महिला भगिनींची सभा घेण्यात आली आयोजित सभेला अनेक माता पालक भगिंनी उपस्थिती होती .

प्रथम श्रीमती वंदना कापसे ,श्रीमती शंकुतला कुचनकार , श्रीमती मंगलाताई टोंगे यांचे शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले कु रोहिणी काळे ( वर्गदुसरा) व कु.कल्याणी आसुटकर (वर्ग सहावा) ह्या विद्यार्थीने सावित्रीच्या जीवनावर आधारीत सुंदर गीत सादर केले. प्रास्ताविक कु माधवी पोटकर (स शिक्षिका) यांनी केले. महिला भगींनीची परिचय व्हावा शाळेतील मुलामुलींच्या प्रगती बद्दल व अभ्यासाबाबत चर्चा व्हावी व शाळेत सुरु असलेल्या आंतरराष्टीय शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यात होणारे बदल यात पालकांची भुमिका या विषयी माहीती दिली .श्री नागोराव ढेंगळे (पदविधर शिक्षक ) यांनी सावित्रीबाईचे जीवन चरित्र व आजच्या मुलामुलीचे शिक्षण याविषयी विचार व्यक्त केले .दरम्यान उपस्थित महिला भगिनीनीं स्वतःचे परिचय देत शाळेतील आपल्या मुलामुलींच्या अडचणी व अभ्यासात प्रगती व शाळेत चालु असलेल्या विविध उपक्रम यामुळे विद्यार्थी झालेल्या परिवर्तना बाबत बिनधास्त मते मांडुन रंगत आली .त्यामधे श्रीमती संगीता ठाकरे ,श्रीमती सविता गाणफाडे श्रीमती प्रतीभा काळे इत्यादी भगीनीनी विचार मांडले

शेवटी मुख्याध्यापक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांना आजच्या आधुनिक युगात नवनवीन शिक्षण पद्धती अवलंबल्याशिवाय पर्याय नाही गेल्या विस वर्षापूर्वी ची स्थिती आणि आजची स्थिती यात खुप अंतर असुन अनेक गोष्टी कालबाह्य झाले आहेत आजच्या विद्यार्थ्यांना लॅपटाप , संगणक , अॅणराईड मोबाईल हाती द्यावे लागेल आणि येत्या तीसचाळीसवर्षानंतर काय स्थिती असेल आज प्राथमिक शाळेत येणारे मुलं जेव्हा पंचवीस तीस वर्षांनी समाजा समोर येईल तेव्हा त्याला आत्मविश्वासाने जगण्याचे सामर्थ्य त्याला असेल का ? प्रस्तापित व्यवस्था हि कुचकामी आहे . याला दुर सारुन आधुनिकतेची कास धरावी लागेल . शाळा हे गावाचे भुषण आहे. गावकरी ते राव न करी गावकर्‍यांच्या सहकार्याने आज वाबडेवाडी येथे आंतंरराष्टीय शाळा म्हणुन देशात नावाजलेली आहे याचे श्रेय सन्मानिय दानशुर गावकंर्‍यांचे आहे मुलांना उद्याला मिळणारे ज्ञान आजच आपल्या शाळेत मिळावे त्यासाठी पालकांच्या धडपडीमुळे एक अत्याधुनिक शाळा निर्माण होते तेव्हा आपण मागे राहता कामा नये आपली शाळा ही काही दिवसात डिजीटल शाळा होवुन आणखी अत्याधुनिक पद्धतीने नव्हे आंतरराष्टीय शिक्षण पद्धतीने काम करेल महिला भगीनीनी विशेष लक्ष देवुन मुलांमुलींच्या अभ्यासाकडे पहावे मुलं काय करत आहे नियमित शाळेत येण्यापासुन तर शाळेतील विविध उपक्रमा विषयी माहीती असावी व विद्यार्थ्यांना नियमित शाळेत पाठविण्या यावे अशी विंनती प्रंसगी व्यक्त केले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु लिना ठाकरे ,कु धनश्री कापसे ( वर्ग सहावा) यांनी केले .या कार्यक्रमासाठी कु. वंदना आस्वले कु. प्रिया राउत श्रीविजय शेळके यांनी सहकार्य केले

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share