WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कंटनेरच्या धडकेत संख्या दोन चुलत भावाचा जागीच मुत्यु तर एक जखमी

Image

प्रतिनिधी/ सचिन मेश्राम (मारेगांव)

कुंभा मारेगाव रोडवरील महागाव वळणावर एका अज्ञात कंटनेर ने दुचाकीला जबर धडक दिल्याने संख्या चुलत भावाचा जागीच करून अंत झाला तर एक जखमी झाल्याची घटना 3 वाजून 45 मिनिटांनी घडली.

सदर अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी रक्तमासाचा सळा विखुरलेला होता. कुंभ्यापासून 4 किमी अंतरावरील महागाव जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात सिमेंट कंटनेर ने दुचाकीला जबर धडक दिली धडक एवढी भीषण होती की मृतक भीमराव टेकाम वय 25 व प्रदीप टेकाम वय 26 राहणार झोटिंगदरा ता. मोहदा या दोघांच्याही अंगावरून गाडीचे चक्के गेल्याने एकाच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला तर दुसऱ्याचे शरीर पूर्णत्वा विद्रुप झाले होते यात दोन संख्या भावाचा मुत्यु झाला असु एक गंभीर जखमी झाला आहे. अपघातग्रस्तांना मारेगांव ग्रामीण रूग्णालयात दाखल करुन यवतमाळ येते तात्काळ हालविण्यात आले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share