WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

यवतमाळ अर्बन बँक शाखा भद्रावती फास्टस्टाग सेवेचा शुभारंभ साह्य व्यवस्थापक गजानन वैदय ह्यांचे हस्ते !

Image

टोल टॅक्स नाक्यावर जे पैसे दिले जात ते आता पूर्णतःकेंद्र सरकारने बंद केले आहे ,त्या ऐवजी फास्टटॉग सेवा सुरू केली असून हे कार्ड मशीन मध्ये टाकल्यावर त्याचे खात्यातून पैसे वजा होतील व पैसे देवाण घेवाण करतांना चा वेळ वाचेल व इंधन वाचेल ह्या करीता केंद्र सरकारने सुरू केलेल्या सेवेचा ग्राहकांना लाभ व्हावा करीता बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा ह्यांनी ही सुरू केली असून आज दिनांक 28/1/2020 रोजी यवतमाळ अर्बन बँकेच्या भद्रावती शाखेत ,बँकेचे साह्य व्यवस्थापक मा श्री गजानन वैदय ह्यांचे हस्ते बँकेचे ग्राहक माजी अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर मया श्री शरद जीवतोडे ह्यांना प्रथम कार्ड देऊन करण्यात आले ह्यां वेळेस भद्रावती माजी शिवसेना तालुका उपप्रमुख बाळकृष्ण गाडगे ,विभागीय अधिकारी सेक्रु रामेश्वर सामुद्रे ,शाखा व्यवस्थापक पराग दवंडे ,प्राधिकृत अधिकारी प्रसाद नावलेकर, चंद्रपूरचे शाखा व्यवस्थापक अरुण राउलकरतथा बँकेचे कर्मचारी शैलेंद्र पर्वते, संजय पोटे, राजू ताठे, एकनाथ मेश्राम, सतीश धनरे,प्रवीण राजूरकर,प्रकाश एकोणकार सह अनेक जण उपस्थित होते

ग्राहकांना फास्टटॉग सेवा यवतमाळ अर्बन बँकेने जलद गतीने कार्ड च्या मध्यमातून उपलब्ध केल्या बाबत माजी अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर मा श्री शरद जीवतोडे ह्यांनी समाधान व्यक्त केले

आपला

प्रसाद नावलेकर

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share