WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

एन. बी. एस. ए महाविद्यालयात मानवाधिकार या विषयावर व्याख्यान

Image

वणी--- स्थानिक एन.बी.एस.ए महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाद्वारे मानवाधिकार या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य रोहित वनकर व व्याख्याते प्रा.डॉ. विकास कृ जुनगरी राज्यशास्त्र विभाग प्रमुख लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी तसेच प्रा.प्रदीप झाडे उपस्थित होते. प्रा.डॉ. विकास जुनगरी यांनी मानवाधिकार या विषयावर बोलताना स्पष्ट केले की मानवाला सन्मानपूर्वक जीवन जगायचे असेल तर मानवाला जन्मतच नैसर्गिक अधिकार प्राप्त झालेले आहेत त्याचे उल्लंघन होता कामा नये तसेच त्यांनी मानव जेव्हा पशुतुल्य अवस्थेत होता तेव्हापासून तर एकविसाव्या शतकापर्यंतचा मानवाधिकार या संदर्भातली सखोल अशी माहिती विद्यार्थ्यापुढे मांडली. ग्रीक कालखंडामध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत होते .ते त्यांनी पटवून सांगितले तसेच राज्यशास्त्राचे जनक ॲरिस्टॉटल ,प्लेटो, थॉमस हॉब्ज अशा अनेक विचारवंताच्या विचारांचा उलगडा विद्यार्थ्यांसमोर केला. मानवाधिकार कायदा 10 डिसेंबर 1948 चा उल्लेख त्यांनी केला तसेच मानवी अधिकार संदर्भातील कायदे इंग्लंडचा 1215 चा मॅग्नाकार्टा 1689 चा बिल ऑफ राईट आणि पहिले व दुसरे विश्वयुद्ध त्यामध्ये झालेली जीवनहानी व कधीच भरून निघणारी असल्याने हा विषय मानवाच्या चिंतनाचा बनला होता. अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर केलेला अणुबॉम्ब हल्ला हा मानव मानवाधिकारांचे उल्लंघन करणारा आहे असे त्यांनी पटवून सांगितले. तसेच भारतीय राज्यघटना मध्ये मानवाधिकार संदर्भात समता ,स्वातंत्र शोषणाविरुद्धचा अधिकार धार्मिक, शैक्षणिक व संस्कृती, घटनात्मक उपायांचा अधिकार(कलम 32) हा घटनेचा आत्मा आहे असे डॉ आंबेडकर म्हणायचे . त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य रोहित वनकर यांनी मानवाधिकार या विषयावर सखोल अशी माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. यावेळी बहुसंख्यांनी विद्यार्थी उपस्थित होते. संचालन व आभार प्रा. अरुण अंभोरे यांनी मानले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share