WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लोहार समाजाचा विश्वकर्मा उत्सव...... विविध स्पर्धा सह रक्तदाना शिबिर व शासकीय योजनांची माहिती....

Image

वणी

जगद्गुरु प्रभु श्री विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून लोहार समाज संघटना शाखा वणीच्या वतीने दिनांक 9 फेब्रुवारी रोजी रविवार ला आंबेडकर चौक नगर भवन कल्याण मंडपम येथे रंगारंग कार्यक्रमास सोबतच सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेआहे

येथील लोहार समाज संघटना शाखा वणी ही समाजकार्या सोबतच सामाजिक उपक्रमात सुद्धा अग्रणी आहे संस्थेच्या वतीने दरवर्षी जगद्गुरु प्रभु विश्वकर्मा ची जयंती ती साजरी केल्या जाते यावर्षी दिनांक 9 फेब्रुवारीला जयंती महोत्सव आंबेडकर चौकातील नगर भवन कल्याण मंडपम सभागृहात साजरा होत असून यात रक्तदान शिबिर अटल विश्वकर्मा योजनेत इमारत बांधकाम कामगार योजना अंतर्गत मिळत असलेल्या 28 योजनेची माहितीपर मार्गदर्शन समाज बांधवांना देणे व नोंदणी न झालेल्यांना सहकार्य करणे तसेच रंगारंग कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा, फॅन्सी ड्रेस ,स्पर्धा डान्स स्पर्धेचे आयोजन करून हा महोत्सव साजरा केल्या जात आहे कार्यक्रमाला समाज बांधवांना व रक्तदात्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात येत आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोहार समाज संघटना शाखा वणी महिला आघाडी व युवक आघाडी परिश्रम घेत आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share