WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत आहे

Image

प्रतिनिधी: रोहन राजु आदेवार

वणी: स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे वेगळ्या विदर्भ राज्याची मागणीची तीव्रता वाढवीत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतिने 10 फेब्रुवारीला संपूर्ण विदर्भात विदर्भातील 11 ही जिल्ह्यात आणि 120 ही तालुक्यात रास्तारोको व जेलभरो आंदोलन होणार आहे त्याचाच एक भाग म्हणून वणी शहरात रस्ता रोको व जेलभरो आंदोलन होणार आहे त्यासाठी दिनांक 7 फेब्रुवारी ला विश्राम गृह वणी येथे मिटिंग घेण्यात आली.

शासन स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा निर्णय घेत नसल्यामुळे विदर्भातील जनतेमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे सरकार कडून नेहमीच विदर्भावर अन्याय होत आलेला आहे त्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समिती कडून 2023 विदर्भ मिशन अंतर्गत ऍक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे याअंतर्गत आंदोलनाची रूपरेषा आखण्यात आली आहे ज्यामध्ये 10 फेब्रुवारी रोजी रास्तारोको व जेलभरो आंदोलन होणार आहे तर 25 फेब्रुवारी नागपूर येथे रेल रोको होणार आहे 1 मे हा काळा दिवस पाळून संपूर्ण विदर्भ बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून मिळाली आहे

त्याचसोबत स्वतंत्र विदर्भ राज्याची त्वरित निर्मिती करा व विदर्भातील जनतेसाठी विजेचे दर निम्मे करा यासाठी 10 फेब्रुवारी वणी येथिल नागपूर रोड च्या पहिल्या टी पॉईंट शिरपूर बाय पास चौकामध्ये होत असलेल्या चक्क जांम आंदोलनात तालुक्यातील जनतेला सहभागी होण्याचे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम पाटील,कोर कमिटी सदस्य रफिक रंगरेज,युवक जिल्हा अध्यक्ष राहुल खारकर,शेतकरी नेते देवराव धांडे,नारायण काकडे,संजय चिंचोळकर,बाळासाहेब राजूरकर दशरथ पाटील,विजयाताई आगबत्तलवार,शालिनीताई रासेकर,यांनी केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.