WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लाभार्थ्यांना माराव्या लागतात वारंवार चकरा, ग्राहकत नाराजीचा सूर

Image

प्रतिनिधी/ सचिन मेश्राम (मारेगाव)

मारेगाव येथील स्टेट बँकेकडून ग्राहकांना वारंवार मनस्ताप सहन करावा लागत असून यामुळे ग्राहक व लाभार्थी कमालीचे परेशान असून बँक प्रशासनाला मात्र ग्राहकांचे काहीही सोयसुतक नसल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीयकृत बँक म्हणून स्टेट बँकेमध्ये अनेकांनी आपले खाते काढले आहे. वेगवेगळ्या योजनांचे लाभार्थी सुद्धा शासनाचे अनुदान मिळावे म्हणून त्यांना राष्ट्रीयकृत बँकेमध्ये कार्यालय सुद्धा खाते काढायला सांगतात. लाभार्थीही आपली बँक म्हणून स्टेट बँकेला खाते काढण्यास प्राधान्य देतात. परंतु मारेगाव येथील स्टेट बँक ही खाते काढण्यापासून ते व्यवहार करणेपर्यंत या ग्राहकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते.

सध्या नानाजी देशमुख प्रकल्पाअंतर्गत शेतकरी लाभार्थी या योजनेचा लाभ मिळावा त्यासाठी या शेतकऱ्यांचे खाते आधार लिंक असणे आवश्यक आहे. इतर बँक या आधार लिंक साठी पाच ते सहा दिवस घेतात पण स्टेट बँक मात्र याच कामासाठी लाभार्थ्यांना वारंवार चकरा मारायला लावतात. साधे आधार लिंकसाठी दोन ते तीन वेळा कागदपत्रे मागवतात जुने कुठे गेले माहित नाही असे म्हणत ग्राहकांना त्रास देत असतात. ग्राहकांनी जर काही विचारले तर उलट त्यांच्याशीच अरेरावी करतात. बँकेने लाभार्थ्यांना त्रास न देता त्यांची कामे त्वरित करावी अशी अपेक्षा लाभार्थी व्यक्त करीत आहे.

मी बँकेत आधार लिंक साठी मागील १५ दिवसांपासून चकरा मारत आहोत परंतु माझे आधार कार्ड अजूनही लिंक करून दिलेले नाही. याविषयी विचारले तर उलट आमचेवरच रागावले जाते आम्हाला वारंवार चकरा मारूनही समाधान मिळत नाही. लाभार्थी दशरथ महादेव मोहारे, रा. बोटोनी यांनी स्टेट बँक विषयी नाराजी व्यक्त केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.