WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विश्वकर्मा जयंती महोत्सव आनंदात साजरा.... कामगारांना केले प्रबोधन....

Image

विश्वकर्मा जयंती महोत्सव आनंदात साजरा....

कामगारांना केले प्रबोधन....

सागर मुने, वणी

जगद्गुरु प्रभु विश्वकर्मा जयंती निमित्त लोहार समाज संघटनेच्या वतीने दिनांक 9 फेब्रुवारीला झालेल्या महोत्सवात नियोजित कामगार मार्गदर्शन व रक्तदान शिबिर तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाला समाजबांधवांनी वणीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. कल्याण मंडपम येथे लोहार समाज संघटना शाखा वणी च्या महिला आघाडी व युवक आघाडी यांच्या विद्यमाने लोहार समाज बांधवासाठी अटल विश्वकर्मा योजना अंतर्गत इमारत बांधकाम क्षेत्रातील असंघटित कामगारांसाठी या योजनेतील समाविष्ट अत्यंत लाभकारी व महत्वपूर्ण संपूर्ण बाबींची माहिती व मार्गदर्शन शिरीष क्षीरसागर व एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयच्या केळकर मँडम द्वारा करण्यात आले, तसेच रक्तदान शिबिर, रांगोळी स्पर्धा ,फॅन्सी ड्रेस स्पर्धा ,डान्स स्पर्धा घेण्यात आली याला सर्व समाज बांधवांनी व वणीकर जनतेनी मोठ्या संख्येने हजेरी लावत भरभरून प्रतिसाद दिला. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रभु विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण कार्यक्रमाचे उद्घाटक लोहार समाज संघटनेचे शाखा - वणी चे अध्यक्ष संजय गाताडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकरराव निंदेकर, सल्लागार वणी हे होते. प्रमुख अतिथी गजाननराव वाघाडे ,महादेवराव कांबळे, हिराजी मडावी अरुण केळझकर भद्रावती रक्तपेढी चे डॉ राहुल व डॉ मोबिन यवतमाळ यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला अध्यक्षा सौ छायाताई बंडू निंदेकर संचालन कु दिव्या गाताडे मान्यवरांचे स्वागत रमेशजी झिगरे, आकाश खंडाळकर, विठ्ठल गाताडे ,अजय सुर्तेकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवक आघाडीचे आकाश खंडाळकर संदीप क्षिरसागर ,महेश पेटकर, तुषार कांबळे , गोलू वाघाडे , निरज चट्टे, सुरज बावणे तसेच महिला आघाडी च्या अमृता चट्टे ,उज्वला सोनटक्के ,पूनम क्षीरसागर ,आरती वाघाडे सारिका गाताडे, उषा गाताडे, शितल गाताडे, किर्ती सुर्तेकर, संगिता सुर्तेकर व योगिता धाबेकर, संगीता सोनटक्के, जयश्री चट्टे, शकुंतला वाघाडे, सुवर्णा क्षीरसागर, छाया गाताडे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.