WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वृत्तपत्रातून चुकीच्या बातमीमुळे स्थानिक कामगारांचे आर्थिक नुकसान ....बेमुदत कामगारांची कंपनीकडून दिशाभूल

Image

प्रतिनिधी कुमार अमोल -

नुकताच एकता असोसिएशन भालर रजी नं. 285 / 17 च्या वतीने जी एम ऑफिस वणी नॉर्थ क्षेत्र वेकोलि मध्ये ठेकेदारी तत्वावर काम करणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपनी हंसा ट्रॅव्हल्स, किंग ट्रॅव्हल्स, इंडिया ट्रॅव्हल्स, राजहंस मूव्हर्स, संजय ट्रॅव्हल्स, अशोक ट्रॅव्हल्स, अविनाश ट्रॅव्हल्स, बालाजी ट्रॅव्हल्स, व इतर कंपनी विरोधात वाहन चालकावर होणाऱ्या अन्याया विरोधात बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. त्यात तीन महिन्यापासून पगार न देणे, वेळे पेक्षा जास्त काम घेणे, पी एफ कटौती न करणे, स्थानिक कामगारांना डावलून बाहेरील कामगाराना आपल्या मर्जीने काम देणे. हे येथील स्थानिक कामगारांच्या विरोधात असल्याने बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे तसेच वृत्तपत्राच्या माध्यमातून चुकीचा संदेश वाचकापर्यंत पोहोचवण्यात आल्याने जनते मध्ये संभ्रम निर्माण करण्यात आला आहे अशे कामगारांनी दूरध्वनी द्वारे कळविले तत्पूर्वी आज पासून कामगारांचा बेमुदत बंद असून वरील मागण्याप्रमाणे कामगारांच्या समस्या सोडविण्यात यावे अन्यथा संबंधित कार्यालयाविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल याकरिता आपण सर्वस्वी जबाबदार असेल.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share