WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आज वणी शहरात चित्रपट अभिनेता सचिन खेडेकर येणार....

Image

सागर मुने, वणी

"वक्ता दशसहस्त्रेषु.." रूपामध्ये विश्वविख्यात असणारे प्राचार्य राम उपाख्य नानासाहेब शेवाळकर यांच्या स्मरणार्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

यावर्षी दिनांक २० फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या प्रांगणात सुप्रसिद्ध सिनेअभिनेता आणि नाट्यकर्मी सचिन खेडेकर यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

नागपूर येथील सुप्रसिद्ध निवेदक आणि मुलाखतकार अजेय गंपावार त्यांची मुलाखत घेणार आहेत.

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय,काकस्पर्श, कोकणस्थ अशा अनेक मराठी चित्रपटांसह अस्तित्व, इम्तिहान, सिंघम सह बोस द फरगॉटन हिरो सारख्या हिंदी चित्रपटांमधून आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा मिळवलेले खेडेकर यानिमित्ताने प्रथमच वणीत येत असल्याने नागरिकांनी या संधीचा बहुसंख्येने लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.