WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

महिलांनी स्वतःची ताकत ओळखली तर प्रत्येकाच्या घरी शिवाजीराजे जन्माला येईल...डॉ करमसिंग राजपूत

Image

लाठी गावात शिवजयंती महोत्सव 2020 उत्साहात साजरा

शिवजयंती महोत्सव 2020 समिती लाठी च्या वतीने दिनांक 19 फेब्रुवारी रोज बुधवार ला सकाळी 8 वाजता लाठी या संपूर्ण गावात ग्रामस्वच्छता मोहीम राबवण्यात आली.गावातील चिमुकल्या मुलांसह शिवमहोत्सव समितीच्या सदस्यांनी पुढाकार घेतला व संपूर्ण गावात ग्रामस्वछता करण्यात आली. गावात प्रभातफेरी काढण्यात आली ज्यामध्ये संपूर्ण गावामध्ये जयघोषणा देत ही प्रभातफेरी संपन्न झाली.

20 फेब्रुवारी ला आराध्य दैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रा.डॉ करमसिंग राजपूत (सुप्रसिद्ध वक्ते)यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष अजय गोवारदीपे होते.तर कार्यक्रमाचे अतिथी म्हणून गावच्या पोलीस पाटील संजीवनी खिरटकर,तंटामुक्ती अध्यक्ष धर्मेंद्र डोहे, अमित उपाध्ये, सागर मुने,शम्स सिद्दीकी,शिवजयंती महोत्सव समितीचे उपाध्यक्ष मुकेश खिरटकर,शिवजयंती महोत्सव समितीचे सचिव प्रभाकर वाघाडे,शिवजयंती महोत्सव समितीचे सहसचिव राजू खोके,मंगल बलकी, अंकुश माहुरे,प्रमोद देवतळे, इत्यादी मान्यवर होते.

प्रमुख पाहुणे सागर मुने यांनी स्त्रियांनी स्वतः जिजा माता होण्यासाठी स्वतःला घडवावे लागते, जिजाऊंना स्वराज्य निर्माण करायचे होते म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांना तसे शिक्षण दिले होते. म्हणून शिवाजी महाराज वेगळे राज्य निर्माण करू शकले. असे विचार व्यक्त केले. त्यानंतर प्रमुख वक्ते प्रा. डॉ.राजपूत सर यांनी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट उलगडून त्यांच कृषिक्षेत्र आणि अर्थशास्त्र खूप चांगलं होत तसेच जातीभेद करू नका शिवाजी महाराज हे जनतेसाठी लढायचे त्यांचा विचार करायचे तत्वनिष्ठ असायचे, महिलांनी स्वतःची ताकत ओळखली पाहिजे असे रयतेच्या राजा या विषयावर बोलताना विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिती डोहे यांनी केले तर प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य राहुल खारकर यांनी केले.आभार प्रदर्शन प्रकाश चार्लीकर यांनी केले.

या द्विदिवसीय कार्यक्रमाला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद असून महिलांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती. या कार्यक्रमाला,विशाल खोके,लोकेश खोके,मनोज डोहे,राहुल खिरटकर,निलेश करडे,ग्रामपंचायत सेवक मंगेश खोके यांच्यासह अनेक युवकांनी परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share