WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शिव जन्मोस्तव समिती अडेगाव तर्फे प्रफुलचा सत्कार

Image

मुकूटबन- मदत करायची असेल तर गरजुला करावी. अशाप्रकारची सद्भावना जपत रक्तदान क्षेञात कार्य करून सरकारी रूग्णालय मधील गोरगरीब गरजु रूग्णाला रक्तदाते तसेच रक्त उपलब्ध करून देण्याचे कार्य प्रफुल हा रक्तविर बहुउद्देशीय संस्था च्या माध्यमातुन सोशल मिडीया च्या वापराने करत असणारा मुकूटबन येथील युवक प्रफुल भोयर याने स्वताच्या नावासोबतच मुकूटबनचे नाव देशात कित्येक ठिकाणी उंचावले. जर परिस्थिति ने गरीब आहे तर पैशांची मदद करू शकत नाही मग अशावेळी एक सामाजीक जिवनाचे भान ठेऊन करावयाची मदद असेल तर ते रक्तदान क्षेत्र आहे. एखाद्याला जिवनदानासाठी रक्त देणं हे खरच खुप मूल्यवान आहे. हेच रक्तदानाचं कार्य प्रफुल गेली कित्येक वर्षे करत आहे. यामध्ये रक्तमिञ जुडविण्यासाठी प्रफुल व त्याच्या सहकारी मिञांना खुप मेहनत घ्यावी लागली. सुरूवातीला एक जिल्हा नंतर दुसरा असे करत करत संपूर्ण महाराष्ट्र मध्ये रक्तमिञ चि एक साखळी निर्माण करून रक्तदानाचे आवाहान देत आज ही साखळी संपूर्ण भारत देशात फिरू लागली. अशाच रक्तमिञाच्या सहाय्याने सोशल मिडीया चा योग्य वापर करून प्रफुल भोयर समाज जिवनात रक्तदानाचे निस्वार्थ कार्य करत आहे. हेच समाजभान ठेवुन सरकारी रूग्णालयात गरजु गरीब रूग्णाला निस्वार्थ रक्तदाते पुरविल्याबद्दल शिव जन्मोस्तव समिती अडेगाव यांच्यातर्फे प्रफुल भोयर चा सत्कार करण्यात आला.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.