WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मारेगावात रेती तस्कराचे दोन ट्रॅक्टर जप्त; दोघांना अभय

Image

प्रतिनिधी/ सचिन मेश्राम (मारेगाव)

पर्यावरणाच्या जाचक अटीने जिल्ह्यातील रेतीघट बंद असल्याने रेती तस्करात कमालीची वाढ झाली आहेत. तालुक्यातील वर्धा नदी, निर्गुडां नदी व नाल्यासह नाल्यातील रेती उपसा राजरोसपणे सुरू आहे. अवैध रेतीची तस्करी करतांना दोन ट्रॅक्टर महसूल विभागाने जप्त केले असून दोन ट्रॅक्टर सोबत तलाठ्यांने हातमिळवणी करुन अभय दिल्याची खमंग चर्चा मारेगांव शहरात सुरू आहेत. प्रशासनाच्या बेताल अर्थपूर्ण संबधाने रेती तस्कराचे चांगलेच फावत असतांना महसूल विभागाच्या कर्तव्या प्रश्नचिन्ह उभे ठकाले आहे.

मारेगांव तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात अव्वाच्या सव्वा दराने रेती राजरोसपणे येत असतांना महसूल विभाग झोपेचे सोंग घेवून आहे. रेती तस्करांना जाळ्यात ओढण्यासाठी तलाठी पथकातील काही बहाद्धर आपले खिसे गरम करित असल्याचा प्रकार तालुक्यातील गोरज व मांगली येथे घडल्याची खमंग चर्चा आहे. वर्धा नदीतुन रेती तस्करी करित असताना तलाठी पथकाने रेती ट्रक्टरला अभय दिले. मात्र हा आपुलकीचा प्रकार कशासाठी केला असावा हे कुण्या भविष्यकाराला विचारण्याची गरज नाही. यात अधिकारी वर्गही हातमिळवणी करित आपले मनसुबे फत्ते करित असल्याचे तालुक्यात चित्र आहे. दरम्यान बुधवारला सकाळी वेगांव केगांव शिवारातुन दोन ट्रॅक्टर जप्त करून आमचे प्रशासन किती पारदर्शक आहे हे दाखविण्याचा केवीलवाणा प्रयत्न केला.

शेकडो ब्राँस रेतीची तस्करी मारेगांव तालुक्यात गत दोन महिन्यांपासून सर्रास सुरु असून करोडो रूपयाचा महसूल बुडविण्याचे षडयंत्र कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे. हे नव्याने सांगण्याची गरज नाही. अशातच महसूल प्रशासनाचे अधिकारी "तेरी भी चुप, मेरी भी चुप" म्हणत आपली वरकमाई करण्यात मशगुल आहे. यात अधिकाऱ्याची अर्थपूर्ण संबंधाची डोळेझाक प्रवृत्ती कारणीभूत ठरत असल्याचे नागरीकातून बोलले जात आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share