WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मराठीचं वाकडं करण्याची कोणाचीही हिंमत नाही : मुख्यमंत्री

Image

“भाषा संस्कारांतून जन्माला येते. जिजाऊंचे संस्कार असलेली आपली मराठी भाषा आहे. ही शक्ती आणि भक्तीची भाषा आहे. चिंतीत भावनेनं मराठी भाषा दिन साजरा करू नका,” असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. विधानभवनात ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. “जेव्हा जेव्हा आपल्यावर संकंट आली तेव्हा मदतीसाठी मराठी धावून आली आहे. स्वातंत्र्य चळवळीदरम्यानही ‘सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का’ हे विचारणारीही भाषा मराठी होती. परकीय आक्रमाणावेळीही मराठी धावून गेली होती?,” असं ठाकरे यावेळी म्हणाले.

“मराठीचं वाकडं करण्याची कोणाचीही हिंमत नाही. आज शाळांमध्ये मराठी सक्तीची का करावी लागते?” असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. मराठी बाबत बोलताना त्यांनी आपल्या मातोश्री मीना ठाकरे यांची आठवण काढली. “मी शाळेत असताना माझी आई पाटीवर अ आ इ ई गिरवून घेत होती, असंही ते म्हणाले. मराठी भाषा ही शुद्ध बोलली गेलीच पाहिजे, तशी ती शुद्ध लिहिलीही गेली पाहिजे. माझ्या आजोबांचा कटाक्ष होता की मराठी भाषा ही ऱ्हस्व दीर्घाप्रमाणेच उच्चारली गेली पाहिजे,” असंही त्यांनी आपल्या आजोबांची आठवण काढताना सांगितलं.

राज्यातील शाळांची नावं मराठीत का नाही असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली. जुन्याची गरज आजही आपल्याला आहे, असं सांगताना त्यांनी घारतील लाईट आणि दिव्याचं उदाहरण दिलं. “पूर्वी वासुदेव यायचे. आम्ही लहान असताना सकाळी वासुदेवांची वाणी ऐकायला यायची. परंतु नव्या पिढीला यातील अनेक गोष्टी माहित नाहीत. ऐकतो मराठी, बोलतो मराठी तसं मराठी ही पाहिलीही गेली पाहिजे,” असंही त्यांनी नमूद केलं. “अनेक संतांनी आपल्याला मोठा वारसा दिला आहे. तो वाढवता आला नाही, तरी आपल्याला तो टिकावता आला पाहिजे. मराठी भाषा दिवस हा एका दिवसापुरता आणि वर्षापुरता मर्यादित न ठेवता आपलं संपूर्ण आयुष्य मराठी राहिलं पाहिजे,” असंही ते म्हणाले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.