WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

घाटंजी आंबा नगरीतील तहसिलदार यांच्या घरा समोर उभ्या फोर व्हीलर ला पेट्रोल ओतून पेटवून दिले

Image

अज्ञात इसमाचा शोध सुरू, फोन टॅपिंग वरुन आरोपी कळेल...!! प्रतिनिधी/ सचिन मेश्राम

घाटंजी येथील अंबा नगरी येथील तहसीलदार पुजा माटोडे यांच्या घरा समोर तिन फोर व्हिलर उभ्या असताना त्यापैकी एका फोर व्हिलर पवन बोडें तलाठी यांच्या गाडी क्र. MH32

Y0539 या गाडीवर पेट्रोल टाकून पेटवून दिले. तहसील कार्यालय कर्मचारी यांची रेती तस्करी पकडण्यासाठी पेट्रोलिंगवर असताना तहसीलदारानांही ही घटना पोट्रोलिंगवर असलेल्या कर्मचारी व तलाठी पवन बोडें यांना फोन द्वारे सांगितले असता टिम घटनास्थळी दाखल झाली असून तोपर्यंत गाडी संपूर्ण जळुन खाक झाली होती. शि.शि.टिव्ही. फुटेज पाहिले असता त्या मध्ये अज्ञान इसम गाडीवर पोट्रोल टाकून गाडी पेटविताना दिसत असुन रात्री एक वाजुन पंधरा मिनिटाची ही घटना. असलेली दिसून येत आहे दि. २६/२ ला रात्री अकरा वाजच्या तहसीलदारचे वाहनचालक गिरी यांना अज्ञान इसमाने मँडमचे लोकेशन घेण्यासाठी फोन करुन मँडमने कोण अस प्रश्न विचारले असता, पत्रकार नाखते बोलतो असे बोलुन फोन कट केला यापूर्वी तहसील कार्यालयाच्या पथकावर अनेकदा. रेती तस्कराने हल्ले केले असून बरीच चोरीशी रेती जप्त करू ट्रँक्टर जप्त केले असुन त्याचा सुड घेण्याचा प्रकार हा प्रकार असल्याचे पवन बोडें यांनी सांगितले. यावरून तहसीलची टिम किती सुरक्षित आहे. केव्हाही याच्यावर हल्ले होऊ शकतात शासनाचा रेतीघाट हर्रास करित नाही. तहसील टिम जिवावर उधार होऊन अवैध रेती पकडण्यासाठी जिवाचे रांन करून पाठलाग करतात पण रेती तस्कराचा सुड उडविण्यातसाठी असा वाईट प्रकार करून मोकळे होतात.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share