WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नगरपंचायत लावतात दिवसाही `दिवे` बेताल कर्मचाऱ्यामुळे अधिकचा प्रशासनावर विज देयकांचा भुर्दंड

Image

प्रतिनिधी/ सचिन मेश्राम (मारेगाव)

बारा हजार लोकसंख्या असलेल्या मारेगांव शहरातील रस्ते संध्याकाळी लखलखाट दिसले पाहिजे अशी विकासाभिमुख संकल्पना अमलात आल्यानंतर शहरातील स्ट्रिट लाईट भर दिवसा म्हणजे चोवीस तास सुरू राहत असल्याने बेताल कर्मचाऱ्याच्या तळीराम भुमिकेने प्रशासनास विज देयकांचा अधिक चा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

मारेगांव शहरात राज्य महामार्गावर शहरातील रस्ते लखलखाट दिसावे या उदात्त हेतूने स्ट्रिट लाईटची उभारणी करण्यात आली. सुर्य मावळताच रस्त्याच्या दुतर्फा विजेचा लखलखाट शहराला जिल्ह्याची प्रचिती येते. नगरपंचायत प्रशासनाने विकासाभिमुख प्रश्न मार्गी लावून शहरात दिवे लावले मात्र, हे दिवे सध्याकाळी कृतीत उतरवायचे असताना सध्यास्थित मागील एक महिन्यापासून हे दिवे दिवसाही सुरू राहत असल्याने जबाबदार बेताल कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उभे टाकले आहे.

प्रशासनाकडुन भरदिवसाही दिवे लावण्याचा प्रकाराने शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधीनाही ही गंभीर बाब लक्षात येत नसल्याने जबाबदार कर्मचाऱ्यावर लागम लावण्यास सपशेल अपयश येत आहे. चोवीस तास स्ट्रिट लाईट सुरू राहत असल्याने विज देयकांचा अधिकचा भुर्दंड प्रशासनावर पडत आहे. मागील काही महिन्यापासून विकासापासून कोसो दुर गेलेली नगरपंचायत प्रशासनाने भरदिवसा विकासाचे दिवे लावावे अशी अपेक्षा मारेगांववासी व्यक्त करित आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share