WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मूळ वारसाला वडिलांच्या संपत्तीतून डावलले

Image

मौजा अडेगाव येथील खंड-क्र.२ साज्या ८५ येथील नानाजी देवाजी दोडके यांची मुलगी माया नानाजी दोडके (सौ.पत्रकार) ही कायद्याने वारसान असून तिला तिच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या धक्कादायक प्रकाराने एकच खळबळ उडाली. या केसेसमुळे येथील तालुक्यातील अशा अनेक केसेसचे बिंग फुटतील.

सूत्राच्या माहितीनुसार गट क्र.७६४ व ७६५ एकूण दोन्ही गटाचे क्षेत्र गट क्र.७६५ क्षेत्र ४.१८ हे.आर गट क्र. ७६४ क्षेत्र १.६२ हे. आर एकूण ५.८० हे. आर हि संपूर्ण शेती श्री. नानाजी देवाजी दोडके यांच्या मालकीची होती. यामधील २.९० हे.आर शेती माया नानाजी दोडके (मुलगी, सौ.पत्रकार) यांच्या हिस्याची असतांना तिला तिचा हक्क न देता संबधित प्रशासकीय लोकांनी हातमिळवणी करून मूळ वारसाला डावलून तिसऱ्याच व्यक्तीला परस्पर नावे करण्यात आली. मात्र असे मूळ वारसाला वगळून भलत्याच नावे करणे असे करता येते का? असा प्रश्न उपस्थित निर्माण झाला, अशी तक्रार सौ. माया गोसाई पत्रकार (दोडके) रा. सोनुर्ली ता. कोरपना जि. चंद्रपूर यांनी केली आहे.

सदर तक्रार कर्त्याचे वडील पेशाने शिक्षक होते. त्यांचे वारसान मीराबाई नानजी दोडके पत्नी (वय ७५), दीपक नानजी दोडके मुलगा (वय ५५), माया नानजी दोद्के मुलगी (वय ४८) हे तीन मुख्य वारस आहेत. यामध्ये आईच्या नावे १.६२ हे. आर वडिलांच्या नावे ४.१८ हे. आर मधून नामे दीपक नानाजी दोडके हा पण पेशाने शिक्षक त्यांच्यावर कर्ज असल्यामुळे त्यांनी त्यांच्या हिस्यातील २.०२ हे. आर वडील हयात असतना विकली, आता शिल्लक शेती ही माया नानाजी दोडके (मुलगी सौ पत्रकार) यांना कायद्याने बहाल केली असता सख्या भावाने वडिलांना धमकावून त्याने स्वता:च्या मुलाच्या नावाने इच्छापत्र करून घेतले.

मात्र, एक लेखी पुरावा म्हणतो कि, सन १९८९ मध्ये नानाजी देवाजी दोडके यांनी नामे माया नानाजी दोडके यांना लग्ना निमित्या मुलीला ४ एकर शेती पंचा समक्ष मुलीच्या उदरनिर्वाहसाठी ४ एकर शेती देण्यास कबुल झाले होते. असे साक्षीदार मारोती नागो क्षीरसागर यांचा लेखी पुरावा दिला असून सुद्धा त्यामूळे वारसाला कायद्याने बहाल केलेली शेती हि तिला मिळावी. याकरिता तलाठी यांनी शासनप्रणाली प्रमाणे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून केश तह्शीलदार व मंडळअधिकारी सुपूर्द केली मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठेच आपली भूमिका न बजावता सरसकट तिसऱ्याच व्यक्तीला ती हस्तांतरित केल्याचे निदर्शनात येते. तक्रारकर्ती सौ. माया गोसाई पत्रकार यांना त्यांचा हक्क मिळाला नाही तर त्यांनी आत्महत्या चा लेखी इशारा दिला असून याला सर्वस्वी मंडळ अधिकारी व तह्शीलदार जबाबदार असतील असे त्यांनी माध्यमांना सांगितले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.