WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अनं एक दिवसासाठी, ती बनली कलेक्टर..!

Image

बुलढाणा : जागतिक महिला दिन हा महिलांनी त्यांच्या अधिकारासाठी केलेला संघर्ष आणि दिलेल्या लढ्याचा ऐतिहासिक दिवस आहे. ज्या महिलांनी आपले आयुष्य क्षणोक्षणी समाजाच्या विकासासाठी झोकून दिले, त्यांचं स्मरण करून त्यांच्या पायवाटी चालणे आपले कर्तव्य आहे. याच दिशेने जिल्हाधिकारी सूमन चंद्रा यांनी एक आदर्श उपक्रम राबवित. २ मार्च रोजी इयत्ता 8 वी’तील टॉपर पूनम देशमूखला एक दिवस जिल्हाधिकारी होण्याचा मान दिला. हा सांकेतिक प्रभार तिला सोपवून सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत तिला विराजमान करण्यात आले. तर पूनमने दिवसभर जिल्हाधिकाऱ्यांची ऐट अनुभवत मुलींच्या शिक्षणासाठी आणि प्रगतीसाठी असणारी धडपड व्यक्त केली.

८ मार्च हा जागतिक महिला दिन. या पृष्ठभूमीवर देशभरात महिलांच्या सन्मानार्थ अनेक कार्यक्रम साजरे करणे सुरु आहे. मात्र कार्यक्रमाची आठवण रहावी प्रशासकीय कामाला सामाजिकतेची जोड मिळावी यासाठी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा या नवनवे प्रयोग राबवित असतात. त्यांनी महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत २ ते ८ मार्च दरम्यान महिला सप्ताह राबविण्याचे ठरवीले असून, त्या अनुषंगाने गुणवत्ता प्राप्त ७ दिवस विद्यार्थींनींना एक दिवसासाठी जिल्हाधिकारी यांचा सांकेतिक प्रभार सोपविणार आहेत. २ मार्च र रोजी बुलडाणा जवळच्या पाडळी गावातील पूनम देशमूखने जिल्हाधिकारी होण्याचा पहिला मान मिळविला. पूनमला प्रशासकीय सेवेत यायचे आहे. तिला खूप शिकून कलेक्टर होण्याची तिची इच्छा असल्याचे तिने सांगितले.<

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.