WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोरोना वायसची वनीकरांन मध्ये धास्ती...! शासकीया कार्यालय व बँकांनमध्ये मास्कचा मोठ्या प्रमाणात वापर

Image

वणी शहर प्रतिनिधी:- निलेश चौधरी

सध्या संपूर्ण जगामध्ये मोठ्या प्रमाणात प्रकोप करणारा, वायरस म्हणजे कोरोना..! चीनमध्ये उत्पन्न झालेल्या या व्हायरसमुळे, हजारो लोकांचे जीव गेला .त्यामुळे संपूर्ण जनता मोठ्या प्रमाणात धास्तावून आहे .यामध्ये वणीकर सुद्धा सुटलेले नाही .

सध्या वणी लगत असलेल्या, वरोरा जि.चंद्रपुर या गावी ,काही दिवसा आधी इराण मधून आलेल्या एका इसमाला कोरोना वायरस ची लागण असल्याचे उघडकीस आले.

त्यामुळे त्याच्यावरती चंद्रपूर येथील वैद्यकीय केंद्रामध्ये 14 दिवस उपचार सुरू आहे.

ही बातमी संपूर्ण यवतमाळ जिल्ह्या सह वणीकरांनमध्ये वार्‍यासारखी पसरली .त्यामुळे संपूर्ण शासकीय, निमशासकीय ,बँका ,यामध्ये संपूर्ण कर्मचारी व्हायरस पासून बचावासाठी मास्क चा उपयोग करत असल्याचे पहावयास मिळत आहे .

या जीवघेण्या व्हायरस पासून, बचावासाठी म्हणून ,जनता विविध प्रकारचे उपायोजना करताना पहावयास मिळत आहे .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share