WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पोलीस पाटीलच करतात रेती तस्करी !

Image

तालुक्यातील मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा व वाहतूक खुलेआम सुरु असून या रेती तस्करांना राजकीय सोबतच प्रशासकीय पाठबळ लाभले असल्याचे चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे.

काल दिनांक 5मार्च ला कोरपना तालुक्यातील वर्धा-पैनगंगा नदी पात्रात व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरु असल्याची सर्व पुराव्यानिशी (ठिकठिकाणी काढलेले गावनिहाय रस्त्यांचे फोटो, उपसा करून टॅक्टर भरतानाचे विडिओ सहित )माहिती देऊन टीम खबरकट्टा ने शिवसेनेच्या महिला आघाडी सोबत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांचेकडे तक्रार दाखल केली.या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करीत कोरपना ठाणेदार यांनी आज दिनांक 7मार्च ला दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस सिपाही कुडावले यांना तात्काळ घटनास्थळी रवाना करीत नारंडा गावानजीक रेती वाहतूक करणारा टॅक्टर मुरली सिमेंट कंपनीच्या बाजूकडील रस्त्यावर सकाळी 6:15 च्या आसपास धाड टाकून नजीकच्या पिपरी गावातील पोलीस पाटील सौ. रेखा तिखट यांचे पती बंडू मुरलीधर तिखट यांच्या मालकीचा ट्रॅक्टर कोरपना ठाण्यात कार्यवाहीस जप्त करून प्राथमिक रिपोर्ट (FIR) करून रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे उल्लेखनीय कार्य केले.तरीही या जप्ती कार्यवाहीत सकाळी धाडस्थळी पकडून ठाण्यात उभे करण्यात आलेले ट्रॅक्टर हे स्वराज कंपनीचे निळ्या रंगाचे नुकतेच कृषी परवान्यावर घेतलेले अजून पासिंग सुद्धा न झालेले ट्रॅक्टर मशीन होते व आता जप्तीत दाखविलेले ट्रॅक्टर मशीन हे लाल रंगाचे आहे त्यामुळे प्रत्यक्ष घटना बघणाऱ्यांचा नागरिकांत प्रशासणीक घोळ करण्यात आल्याच्या चर्चेला उधाण फुटले आहे. यावरून राजकीय पाठबळासोबतच प्रशासनाचे सुद्धा हाथ रेती तस्करीत रंगलेले आहेत यात शंका उरत नाही....!!!!

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share