WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भरधाव ट्रक ने तोडल्या घराच्या वीजतारा

Image

कुमार अमोल

वणी शहरातील मुख्य रस्त्याच्या बाजूला वसलेल्या घराच्या वीजतारा भरधाव ट्रक ने तोडल्या. यात घरमालकाचे किरकोळ नुकसान झाले असून रात्र अंधारात काढण्याची वेळ आली आहे.

प्राप्त माहितीनुसार टी एस 36 टी 3322 या क्रमांकाचा अठरा चाकी ट्रक यवतमाळ ते चंद्रपूर जात होता. जड वाहनास शहराबाहेरून जाण्यासाठी मार्ग असून सुद्धा या ट्रक चालकाने शहरातील मुख्य मार्ग टिळक चौकातून सरळ दीपक टॉकीज रस्त्याने ट्रक टाकला. रात्रीची वेळ असल्याने त्याला छुप्या मार्गाने जाणे असल्याने त्याने सुभाष चंद्र चौकातील घराच्या वीजतारा तोडल्या या घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली असता स्थानिक पोलीस घटना स्थळी पोहचले. दरम्यान अचानक अंधःकार पसरल्याने परिसरातील नागरिकांची एकच गर्दी जमली होती. संतापलेल्या जैन घरमालकाने ट्रक चालकाला नुकसान भरपाई मागितली असून तात्काळ तक्रार करण्याची उपस्थित पोलिसांना मागणी केली.

यावेळी बघ्याची एकच गर्दी जमली होती. ही घटना पहिलीच नसून आतापर्यंत चार ते पाच वेळा जड वाहनाने वीजतारा तोडल्या असून या कुणी कडे लक्ष देत नसल्याचे उपस्थिती लोकांनी खंत व्यक्त केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.