WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नगरसेविकेच्या घरच्या गाड्यांना जाळपोळीचा प्रयत्न?.......

Image

प्रतिनिधि सूरज चाटे वणी :-

2 दुचाकी जळाल्या :- वणी पोलिसात तक्रार दाखल, आरोपीवर कारवाईची मागणी...

शास्त्रीनगर परिसरातील नगरसेविका अक्षता कोकाजी चव्हाण यांच्या घरी असलेल्या त्यांच्या मालकीच्या दोन दुचाकी वाहनांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला सदर घटना दिनांक 9 च्या पहाटे 2 वाजताच्या दरम्यान घडली असून यात हात कुणाचा? यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून मोठी घटना घडवून आणण्याचा नियोजीत कट सुद्धा नाकारता येत नाही, त्यामुळे परिवारातील कुंदन कोकाजी चव्हाण यांनी रात्री घटनेचे गांभीर्य समजून रात्रीच वणी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.

वणी नगरपरिषदेवर नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या अक्षता कोकाजी चव्हाण यांच्या शास्त्रीनगर येथील घरी समोरच उभ्या असलेल्या tvs wego, suzuki GS150R या दोन दुचाकीना काही कटकारस्थान करणाऱ्या लोकांकडून मध्यरात्रीच्या सुमारास दोन्ही गाड्यांवर बारदाना/पोते टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी आगेने चांगलेच रुद्र रूप धारण केले होते रात्री 1.30 वाजताच्या सुमारास जेव्हा भडका वाढला तेव्हा घरच्यांच्या लक्षात आले की आपल्या वाहनांना कुणीतरी जाळले त्यामुळे त्यांनी आपल्या घरच्या पाण्याने त्याला विझविण्यात यश आले त्यांनतर त्यानी वणी पोलीस स्टेशन गाठले व तक्रार नोंदविली पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.