WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

गौराळा येथे गृप होकेशनल ट्रेनिंग सेंटरचे थाटात उद्घाटन

Image

वणी:

खनिकर्म सामूहिक व्यावसायिक प्रशिक्षण संस्था गौराळा (मारेगाव ) यांच्या विद्यमाने ग्रुप व्होकेशनल ट्रेनिंग चे उद्घाटन गुरुवार दि.6 ऑक्टोबर 2022 ला सकाळी 9:30 वाजता डॉ.सागेशकुमार M.R (DMS नागपूर क्षेत्र यांच्या हस्ते पार पडले.यावेळी अध्यक्ष कृष्णकुमार राठोड, उपाध्यक्ष अलंकार गुंडावार, सचिव विलास जोगी,अभिजीत दत्ता युनिट हेड आरसिसिपिएल मुकुटबन, भुसारिजी टेक्निकल हेड दालमिया सिमेंट, के. सुभुलक्ष्मन चीफ ऑपेरेशन मॅनेजर अंबुजा सिमेंट, एस. के. तिवारी मायनिंग हेड अल्ट्राटेक सिमेंट, सुरेश वांढरे मायनिंग हेड ऐसिसि सिमेंट यांचे सह सर्व सिमेंट कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व इतर एजंट माईन्स, एच ओ.डी. व अभियंते उपस्थित होते.

वणी व चंद्रपूर परिसर हा खनिज संपत्तीने नटलेला भाग आहे.त्यामुळे या भागात यावर आधारित अनेक उद्योग उभारले गेले आहे.या ठिकाणी अनेक कामगार काम करीत असतात परंतु खनिकर्म कामगारांना प्रशिक्षण दिल्या जात नाही.त्यामुळे काम करीत असताना अनेक अपघात घडत असतात. त्यामुळे त्यांना प्रशिक्षित करण्याचा विढा खनिकर्म सामूहिक व्यावसायिक प्रशिक्षण संस्था गौराळा या संस्थेने उचलला आहे.गौराळा येथे स्थापन करण्यात आलेल्या प्रशिक्षण संस्थेत खनिकर्म कामगारांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने त्याचा फायदा परिसरातील खनिकर्म कामगारांना होणार आहे. तरी याचा लाभ कामगारांनी घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share