WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

इंधन दरवाढीच्या विरोधात विरोधी पक्षाच्या बंदला वणीत उस्फुर्त प्रतिसाद..

Image

सुरज चाटे वणी :- देशात इंधनाचे दर गगनभेदत असतांना ही महागाई सामान्य जनतेचे कंबर मोडत असल्याचा दावा सर्वत्र होत आहे. याच अनुषंगाने इंधन दरवाढीच्या विरोधात सम्पूर्ण भारत भर देशातील राष्ट्रीय काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंद मध्ये आज राज्यातील राष्ट्रीय पक्षाबरोबर प्रादेशिक पक्षांनी यात सहभाग नोंदविला असून वणीत दिनांक 10 ला व्यापारी प्रतिष्ठाने बंद करून या बंद मध्ये व्यापारी तथा आदींनी पाठिंबा दर्शविला हे बंद वणीत शांतता पूर्ण वातावरणात पार पडला, पोलिसांनी सुधा चौका चौकात चोख बंदोबस्त ठेवत कोणतेही अनुचित प्रकार होणार नाही या करीता पोलिसाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

वणीत आज दिनांक 10 ला सकाळी 10 वाजताच्या दरम्यान बंदला आज सर्व शहरातील व्यापाऱ्यांनी या बंदला उस्फुर्त प्रतिसाद देत, आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. यावेळी सकाळी शहरात रॅलीचे आयोजन करून ही इंधन दरवाढ थांबून जनेतला आर्थिक लुटीपासून वाचवावे अश्या आशेयाचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. काढण्यात आलेली रॅली खाती चौक, गांधी चौक, गाडगेबाबा चौक, भगतसिंग चौक, सर्वोदय चौक, टागोर चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवाजी चौक करीत तहसीलवर येत उपविभागीय अधिकारी यांना विविध पक्षा मार्फत निवेदन सादर करण्यात आले, यावेळी वणीतील विविध राजकीय पक्ष सहभागी होऊन पक्षातील पदाधिकारि यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषना बाजी केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share