WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी शहरातील प्रसिद्ध डॉ. अब्दुल सत्तार हे मॉर्डन फॉरमोकोलॉजी परीक्षेत उत्तीर्ण

Image

महाराष्ट्र आरोग्य विज्ञाण विद्यापिठा अंतर्गत घेण्यात आलेल्या एका वर्षाचा आधुनिक वैद्यक शास्त्राचा मॉर्डन फॉरमोकोलॉजी या पदवितर परीक्षेचा निकाल 21 फरवरी रोजी जाहिर झाला आहे. या निकालात वणी शहरातील प्रसिद्ध डॉ. अब्दुल सत्तार है उत्तीर्ण झाले आहे. त्यांचे वय 68 वर्षाचे असून त्यांनी हा कोर्स चांगल्या रितीने अभ्यास करुन उत्तीर्ण केला आहे. विशेष म्हणजे हे वणी मधे मागील 50 वर्षा पासुन प्रैक्टिस करीत आहे, ते वणीतील सगळ्यात सीनियर डॉक्टर म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या यशामुळे वणी तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. यवतमाल येथील वसंतराव नाईक शासकिय वैद्य- किय महाविद्यालयात या अवघड अभ्यासक्रमात आधुनिक मेडिसिन सर्जेरी, लहान मुलांचे आजार, स्त्रियांचे विविध आजार, सार्वजनिक प्रतिबंधात्मक आजार या विषयी त्यांनी अभ्यास केला. या यशाबद्दल वैद्यकीय शेत्रातून व वणी शहरातून त्यांचे कौतुक केले जात आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले