WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लो. टिळक महाविद्यालयात शिवजयंती, यशवंतराव चव्हाण जयंती....

Image

सागर मुने, वणी

लोकमान्य टिळक महाविद्यालयात चालविल्या जात असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्राच्या द्वारे तिथीनुसार शिवजयंती आणि तारखेनुसार यशवंतराव चव्हाण जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी केंद्र संयोजक,कार्यकारी प्राचार्य प्रसाद खानझोडे, डॉ. अभिजित अणे आणि डॉ. स्वानंद पुंड उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आरंभी केंद्र संचालक प्रा. राजेंद्र कोठारी यांनी या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करून यावर्षी विशेष कृती पद्धतीने या जयंतीला साजरी करण्याची योजना सादर केली.

त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सहभागातून आगामी काळात विविध योजना कशा कार्यान्वित होणार आहेत? त्याची माहिती सादर केली.

यावर्षी मुक्त विद्यापीठ केंद्राच्या द्वारे वणी मध्ये असणाऱ्या गतिमंद विद्यार्थ्यांच्या सेवासदन संस्थेत आणि अनाथ बालकांच्या बाल सदन संस्थेत विविध फळे आणि बिस्किटांच्या वाटपाचा अभिनव कार्यक्रम घेण्यात आला. अशा प्रकारची ही योजना अत्यंत अभिनव, गरजवंतांच्या प्रत्यक्ष उपयोगाची आणि कायमस्वरूपी चालवण्यास योग्य असल्याचे मत प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन शिंदे याने तर आभार प्रदर्शन गणेश आसूटकर

याने केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले