WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी तालुक्यातील भारनीयमन तत्काळ बंद करा ( संभाजी ब्रिगेड ची मागणी )

Image

सुरज चाटे वणी - तालुक्यातील त्वरित भारनियमन सरसकट बंद करण्यात यावे य़ा मागणी साठी संभाजी ब्रिगेड वणी तालुक्याच्या वतीने म रा वि वि कार्यालय मध्ये शाखा प्रबंधक यांना निवेदन देण्यात आले . Image

सदर निवेदनामध्ये वणी तालुक्यतील सरसकट त्वरित भारनियमन मुक्त करण्यात यावे कारण सध्या परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या पिकाला पानी देण्याचे काम सुरू आहे परंतू दिवसभर लाईट नसल्यामुळे रात्री पानी देने शक्य नाही व तसेच वन्य प्राण्यांचा धोका बघता ते जीवघेणे ठरू शकते .तसेच शालेय विध्यार्थीच्या प्रथम सत्रांत परीक्षा सुध्दा सुरू आहे अश्या परिस्थितीत वणी तालुक्यातील शेतकऱयांना व विध्यार्थीना भारनियमनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी संभाजी ब्रिगेड वणी तालुका शाखे कडे आल्या आहे .तरी आपण संभाजी ब्रिगेडच्या विनंती ला मान देऊन भारनियमन तत्काळ बंद करावे .अन्यथा संभाजी ब्रिगेड तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल व त्यानंतर होणाऱ्या नुकसानीला माहावितरण कार्यालय जबाबदार राहील .

अशा पढ्तिचे निवेदन संभाजी ब्रिगेड वणी च्या वतीने देण्यात आले य़ा वेळी , अजय धोबे जिल्हा अध्यक्ष ,विवेक ठाकरे तालुका अध्यक्ष , अभय पानघाटे .दत्ता डोहे , संदीप रिंगोले , शंकर पुनवटकर , भोजू रीण्गोले , राजू बोकडे , चंद्रभान बान्दुरकर , गजानन बण्दूरकर , देवदास बान्दुरकर , नुकुल थेटे , अमित गाताडे , व शेकडो संभाजी ब्रिगेड कार्यकरते व ग्रामीण भागातील शेतकरी उप्स्तीत होते .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share