WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अल्पवयीन मुलावर इसमाकडून लैंगिक अत्याचार, निमणी येथील घटना

Image

•संतप्त नागरिकांनी फाशीची शिक्षेची मागणी...!!

•गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार...!!

प्रतिनिधी/ रफिक शेख (गढचांदूर)

गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार निमणी येथील घटना

कोरपना तालुक्यातील निमणी येथे इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर एका इसमाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना आज दि. १५ ला सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान घडली.

महादेव उत्तम गोंडे (२८) रा. निमणी असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध गडचांदूर पोलीस ठाण्यात पीडित मुलाने व त्याच्या परिवाराने तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलगा ११ वर्ष व त्याचा मित्र वय १५ हे दोघेही गावाजवळील शेतात बकऱ्या राखत असताना आरोपीने तुम्हाला हरभरा देतो म्हणून स्वतःच्या शेताकडे मोटारसायकल वर बसवून घेऊन गेला व रानजीच्या झाडाखाली मोटारसायकल ठेवली व त्यांना कपडे काढायला सांगितले असता तिथून दोघांनीही पळ काढला व आरोपी त्या दोघांच्या मागे धावू लागला व पीडित मुलगा वय ११ वर्ष यांना पकडून त्यांना खांद्यावर उचलून शेतात घेऊन गेला व त्याचे पाय शेतातील वेलांनी बांधून त्याला मारझोड करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला त्यामध्ये पीडित विद्यार्थी जखमी झाला असुन त्यांनी व त्याच्या मित्रांनी ही माहिती आपल्या आईला दिली असून आईने व मुलांनी गडचांदूर पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली. पोलीस ठाणेदार गोपाल भारती यांनी शहानिशा करून आरोपींविरुद्ध कलम ३७७ आय पी सी ४/८/१० (३,२,५) पोक्सो अ‍ॅट्रास‌िटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंद करून अटक केली आरोपीला सोमवारला न्यायालयात हजर केले असता ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले