WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी- वरोरा मार्गावर भीषण अपघात,एकाचा मृत्यू तर दोन गंभिर जखमी

Image

आज संध्याकाळी वणी-वरोरा मार्गावरील नायगावजवळ ऑटो व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला तर त्याच्या सोबत असलेल्या दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज दि.16 मार्चला संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास गोपाळ प्रकाश मुगरे, अनिकेत विनायक धारणे व सागर मनोहर चौधरी हे वाघाडा तालुका चिमुर येथील रहिवाशी असून ते वणीला कामानिमित्त आले होते. संध्याकाळी गावाला परत जातअसतांना नायगाव फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणारा ऑटो क्र.एमएच 29 एम 5407 या दुचाकीला एमएच 34 क्यु 7679 या अँटोने जोरदार धडक दिली.

या अपघातात गोपाळ प्रकाश मुगरे (25) याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेले अनिकेत व सागर यांनाही दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सावर्ला येथिल अँटो चालकावर कलम 279,337, 404(अ)भादवी अ 134 अ,134 ब मोटार वाहन कायद्यांनुसार गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले