WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोरोना आजारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण चीनमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

Image

प्रतिनिधी रोहन राजु आदेवार

यवतमाळ: कोरोना या आजारामुळे चीनमध्ये तब्बल साडे तीन हजार जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, जगभरात दीड लाखापेक्षा जास्त लोकांना या आजाराची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. मात्र, हा जीवघेणा कोरोना विषाणू आता महाराष्ट्रातही येऊन धडकला आहे. व भारतामध्ये सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहे अश्यातच यवतमाळ येथील 9 जण दुबई येथे जाऊन होते व ते परत आल्या नंतर त्याची चाचणी केली असता त्या मधील दोन रुग्ण पोसिटीव्ह आहे व त्यांची चाचणी नागपूर येथे सुरू आहे.

शिक्षण विभागानेसुद्धा कोरोनाचा धोका लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासंदर्भातच पत्र पाठविले आहे. कोरोना व्हायरस टाळण्यासाठी गर्दी टाळा असा सल्ला दिला जात आहे. पण सर्वाधिक गर्दी होणारे ठिकाण म्हणजे शाळा, महाविद्यालय, क्लास, वाचनालय आहेत. येथे होणारी गर्दी ही आहे. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्यांपेक्षा कमी असल्याने मुलांना शिक्षणासाठी पाठविताना पालकांची भीती वाढली आहे. त्या मुळे विद्यार्थ्यांना क्लासमध्ये व्हायरसपासून बचाव करण्यासाठी ज्या सूचना मिळत आहेत त्याचे पालन करीत आहे. मुलाला सॅनिटायझर, तोंडाला रुमाल बांधून बसावे लागत आहे. तर विद्यार्थ्यांना आपआपल्या गावी परत जावे लागत असल्याने त्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे कारण काही दिवसानंतर विध्यार्थ्यांच्या राज्यसेवा तसेच विविध परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांनमध्ये चिंतेचे वातावरण आहे.तसेच व्यवसायावर पण या कोरोनाचा परिणाम पडला आहे. अनेकांची तहान भूक पळवली आहे.

अशातच पुण्यात शिक्षण घेणाऱ्या एका मुलाला त्याच्या आईने गावाकडून केलेला एक फोनकॉल चांगलाच व्हायरल होत आहे. “माझ्या राजा तू आताच्या आता पुण्यातून गावाकडं ये, मी तुझ्या पाया पडते”, अशी विनवणी ही माऊली तिच्या मुलाकडे करत आहे. डोळ्यात पाणी आणणारा हा फोनकॉल सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कोरोना विषाणू आजाराची लक्षणे : साध्या सर्दी-खोकल्यापासून यांसारख्या गंभीर आजारांसाठी कोरोना विषाणू कारणीभूत असतात. आजाराची लक्षणे ही मुख्यत: श्वसनसंस्थेशी निगडित म्हणजेच इन्फ्लुएन्झा आजारासारखीच असतात. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, निमोनिया, काहीवेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे साधारणपणे आढळतात. सर्वसाधारणपणे हा आजार हवेवाटे शिंकण्यातून व खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share