WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीत शासन नियमाचे उल्लंघन......कोरोना वायरस :- जनतेनी सहकार्य करण्याची गरज

Image

वणीत शासन नियमाचे उल्लंघन......

कोरोना वायरस :- जनतेनी सहकार्य करण्याची गरज

जगभरात सध्या करोना वायरस चा प्रादुर्भाव जोराने वाढताना दिसत असून शासनाने कोरोना वायरस जलद गतीने पसरत असल्याचे लक्षात घेता काही नियम व तरतुदि लागू केले असून सदर आदेश पाळणे गरजेचे आहे, परंतु वणीचे दुकाने व आदी ठिकाणे दिलेला कालावधी लोटून जात असून सुद्धा शासन निर्णयाचे उल्लंघन करताना दिसत आहे त्यामुळे वणी सह महाराष्ट्रातील जनतेनी सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे.

कोरोना वायरस दिवसा गणिक थैमान घालत असून जगभरात सध्या स्थितीत चांगलाच धुमाकुळ घातला आहेत, त्यामुळे चिंताजनक परिस्थिति निर्माण झाली असून यावर शासनाने काही आदेश निर्गमित केले आहे त्याचे तंतोतंत पालन करने आवश्यक झाले आहे. शासनाने काढलेल्या आदेशनुसार जीम, दुकान, रेस्टोरेंट आदी सायंकाळी आठ वाजता बंद करण्याचे आदेश

असून सुधा वणीत सदर आदेशाचे पायमली होताना दिसत आहेत.

तसेच सदर आदेश हे जनतेच्या हिताकरिता असून आपली जनता कश्याप्रकारे सुरक्षित व निरोगी राहिल या उद्देशाने काढण्यात आले असून कोरोना वायरसला मात देण्याकरिता जनतेनी सुद्धा सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले