WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शेतकऱ्यांचा मुलगा बनला पीसआय, मोहूर्ली येथील विद्यार्थी

Image

•राहुलने जिद्द चिकाटी आणि मेहनती च्या बळावर यश खेचून आणलं...!!

प्रतिनिधी/ शंकर घुगरे (वणी)

वणी तालुक्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मोहर्ली या गावाचा मुलगा राहुल अशोक वरारकर

हा राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण करून पोलीस उपनिरीक्षक बनला अतिशय जिद्द धडपड आणि शांत संयमी स्वभावाचा राहुलने मोठया कष्टाने स्वकर्तृत्वाने हे यश संपादन केले अपयशात कुणीच मदतीला येत नाही यशात सारेच मागे फिरतात कुठल्याही प्रकारचा राहुलने क्लास न लावता ये यश संपादन केल वणी येथील नगरपरिषद च्या स्वामी विवेकानंद अभ्यास गटात त्याने अभ्यास केला लायब्ररी मधील सर्व विद्यार्थ्यांनी त्याला मोलाचे सहकार्य केले स्पर्धेच्या युगामध्ये हजारो रुपये कोचिंग वर खर्च करूनही यश मिळत नाही पण राहुल ने मात्र जिद्द चिकाटी आणि मेहनतीने हे यश खेचून आणलं 2018 ची पीसआय ची परीक्षा राहुल ने दिली त्याच्या पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा शारीरिक चाचणी आणि मुलाखत अशा टप्याला राहुल ने यशस्वी रित्या तोड दिली मेहनत जिद्द आणि अभ्यासात सातत्य हे यशाचं गमक आहे. हे राहुलने सिद्ध करून दाखवलं तो आपल्या यशाचे श्रेय आई वडील गुरुजन आणि मित्र परिवाराला देतो.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share