WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी पालिकेकडून निर्जंतुकीकरनाची फवारणी...

Image

जगभरात कोरोनाचा रोना :- वणी पालिका घेत आहे नागरिकांची काळजी...

वणी:- सुरज चाटे, जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ

कोरोना विषाणूने जगात धुमाकूळ घालत दहशत पसरवली आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व यंत्रणा युद्ध स्तरावर प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून येथील नगर परिषद द्वारा नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या पुढाकाराने पूर्ण वणी शहर निर्जंतुकीकरण करण्याचा विडा उचलून या कामाला आज दि. 23 मार्च पासून प्रत्यक्ष फवारणीला सुरुवात करण्यात आली आहे.

नगर परिषद कडून वणी शहर निर्जंतुक करण्यासाठी सोडियम हायड्रोक्लोराइडची फवारणी करण्याची सुरुवात करण्यात आली आहे. या कार्याच्या शुभारंभ प्रसंगी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, मुख्याधिकारी संदीप बोरकर, आरोग्य सभापती मंजुषा मंगेश झाडे उपस्थित होते. वणी शहरात फॉगिंग मशीन द्वारे चालू आहे. याव्यतिरिक्त उद्यापासून छोट्या फवारणी मशीनद्वारे सुद्धा फवारणी करून पूर्ण शहर निर्जंतुन करण्यात येणार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले