WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीकरांनो कोरोनापासून सुरक्षित राहायचे असेल, तर हे करा...!

Image

अमोल खराटे वणी :-

वणी तालुक्यातील सर्व जनतेला wanicity.com तर्फे एक कळकळीची विंनती आहे की त्यांनी आपलं घर, आपला परिसर आधी स्वच्छ करून घ्यावा. त्याचबरोबर कोरोनावर मात करायची म्हणून रोजच्या खाण्यात एनर्जी मिळतील असेच आहार खाण्यात यावी जेणेकरून त्यापासून आपल्यला भरपूर एनर्जी मिळेल आणि रोगप्रतिकारक शक्ति वाढेल.

तर सर्व प्रथम आधी आपले घर स्वच्छ करा, त्यानंतर आपल्या घराच्या आजू-बाजूचा परिसर जसे कचरा, घाण असेल ती लगेच साफ-सफाई करा, घराबाहेर पाणी मारत असतांना पाण्यात फिनाईल टाकून बाहेर पाणी टाका. घरातील कपडे ते स्वच्छ धुऊन घालावे, अंघोळ करत असताना डेटॉल साबुनचा वापर करावा, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढेल तोच आहार करणे गरजेचे झाले आहे. आता पर्यंत कोरोनाचे नेमके काय निदान आहे ते अजूनही कळाले नसले तरी, जेवढी आपण काळजी घेऊ तेवढे आपलाच फायदा असेल. त्यामुळे सर्वांनी याची दखल घ्यावी.

सध्याच्या स्थिती पाहता आरोग्य विभाग तसेच पोलीस यंत्रणेला सहकार्य करणे ही गरजेचे झाले आहे. त्याशिवाय आपण सुरक्षित राहू शकत नाही. एक खबरदारी म्हणून आपण सगळे घरातच बसायचं आहे. घराबाहेर पडायचं नाही. 21दिवसाचा कालावधी आपल्यासाठी फार चिंताजनक जरी असला तरी तो आपल्या सर्वासाठी फायदेशीर ठरणार एवढं नक्की सांगू शकतो. तर घरातच रहा, इतरांनाही घरातच राहायला सांगा.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले