WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

coronavirus : प्रवाशांची जनावरांप्रमाणे कंटेनरमध्ये कोंबून वाहतूक

Image

प्रतिनिधि योगेश मडावी झरी :-
तेलंगाणावरून निघालेला कंटेनर (एच.आर.७३/ए-६९८३) पिंपळखुटी (ता.पांढरकवडा) चेकपोस्टवर पोलिसांनी तपासणीसाठी थांबविला. गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला. संशय आल्याने चेकपोस्टवरच्या पोलिसांनी कंटेनरचे कुलूप उघडायला लावले. आतले दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. जवळपास ३०० जण या कंटेनरमध्ये अक्षरश: कोंबलेल्या अवस्थेत आढळून आले. पूर्वी जनावर तस्करीसाठी या पद्धतीचा वापर केला जात होता. कंटेनेरमधून आलेल्या नागरिकांना चेकपोस्टवरूनच तेलंगाणात परत पाठविण्यात आले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले