WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चंद्रपूर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीला गरोदर करून नऊ महिने पीडित कुटुंबाला ठेवले धाकात :

Image

धक्कादायक चंद्रपूर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीला गरोदर करून नऊ महिने पीडित कुटुंबाला ठेवले धाकात : खाजगी डॉक्टरांकडे डिलिव्हरी ला नेल्यावरही डॉक्टरांची सतर्कता नाही : पैशाअभावी खाजगी डॉक्टर ने परत पाठविले : अखेर शेजाऱ्यांच्या सतर्कतेने आरोपीवर गुन्हा दाखल व तात्काळ अटक

शहरातील टेकडी विभाग महाराणा प्रताप वॉर्ड येथील रहिवासी एका १३ वर्षीय नाबालिक मुलीला शेजारच्या २१ वर्षीय आरोपी शिवा रमेश भेंनवाल याने गर्भवती केल्याने पास्को कायद्याअंतर्गत त्या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत शेजारच्या लोकांना माहिती मिळताच वॉर्डवासी पीडितेच्या घरासमोर गर्दी करून लागले होते. ते पाहताच आरोपीने पीडित मुलगी व तिच्या आईवडील यांना धमकावून चंद्रपूर येथे दवाखाना येथे नेले. परंतु तेथे गर्भपात झाला नसल्याने पीडित मुलगी व आईवडिलास घेऊन गायब झाले असल्याची माहिती शेजारच्या लोकांना कळली. लोकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक भगत यांनी लगेच पोलीस यंत्रणा फिरवली व मोठ्या शिताफीने चंद्रपूर येथील रायत्तवारी येथून एका घरात लपुन ठेवलेल्या पीडित मुलगी व आईवडील यांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले. तसेच आरोपीस à¤˜à¥‡à¤Šà¤¨ बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे २६ मार्चला सकाळी साडेअकरा वाजता आणले. दिवसभर पीडित मुलीची शहानिशा करून शेजारच्या महिला फिर्यादी दीपिका मनोज डुग्लच व मीनाक्षी भारत चुनियाने यांच्या रिपोर्टच्या आधारे आरोपी शिवा रमेश भेनवाल (२१), त्याचा मोठा भाऊ राजेश रमेश भेंनवाल (३५) व त्यांच्या बहिणीवर कलम ३७६ (३)पास्को कलम ४, ५, (आय) (क्यु), ६, १६, १७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक श्रीमती राजूरकर करीत आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले