WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जिल्हा पोलिस अधिक्षकानी घेतली कर्मचाऱ्यांची काळजी...

Image

कोरोनाचा रोना करू :- त्याकरिता आपण सुद्धा नियम पाळू....एम राजकुमार

वणी :- सुरज चाटे, जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ

जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार यांनी आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वितरण केले. एक एसपी असलेला अधिकारी आपल्या पोलीस कर्मचाऱ्याला स्वतःच्या हाताने मास्क बांधून कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्याचे सांगितले व मार्गदर्शन केले, असे म्हणतात नेतृत्व खंबीर व प्रेमळ असले की काम चोख होते व गतीने होते. त्यांच्या खंबीर नेतृत्वात जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सक्षमपणे काम करीत आहे. पोलिस जीव तळहातावर घेऊन जनतेची सेवा करीत आहे.

संचारबंदीत नागरिकांनी घरांत राहून, बाहेर न पडता पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह व जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार या दोघांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील जनता सुरक्षित आहे. गेल्या पंधरा दिवसांत कोरोनाचा एकही नवीन रुग्ण नसणे व घरी देखरेखीत 88 रुग्ण असणे ही बाबच फार आशादायक आहे. पुढे ही लढाई जिंकण्यासाठी लोकांनी घरांत राहणे हाच एकमेव पर्याय आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले