WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शिवसेनेच्या वतिने गोर गरिबांना अन्नधान्याची व्यवस्था...गरजूंना मिळणार घरपोच भोजन,,,,

Image

कोरोना विषाणू ने देशभरात धुमाकूळ घातला असून ही परिस्थिती आटो्क्यात आणण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी व लॉकडाऊन आहे.

शासन प्रशासनाच्या विविध यंत्रणा विविध ठिकाणी प्रभावी कर्तव्य पार पाडत आहे; मात्र निवासी विद्यार्थी ,गोर गरिबांच्या दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था होणे हे चिंतेची बाब आहे त्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विश्वासभाऊ नांदेकर यांच्या पुढाकाराने तालुका प्रमुख रविभाऊ बोढेकर यांच्या नेतृत्वाखाली गोरगरीब गरजूंना मिळणार घरपोच भोजनदान करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे

गरजू व गोरगरिबांना घरपोच भोजन व्यवस्था करण्यात येत आहे. तरी आपल्या परिसरात कोणी असल्यास संपर्क करावे असे आवाहन शिवसेना व युवा सेना पदाधिकारी विक्रम चचडा, महेश चौधरी,अजय नागपुरे,प्रशांत बालकी,नरेंद्र ताजने,बंटी येरने,वतीने करण्यात येत आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले